12 सप्टेंबर : इंडियन मुजाहिद्दीनचा संस्थापक अतिरेकी यासीन भटकळच्या चौकशीतून धक्कादायक खुलासा झालाय. भटकळच्या चौकशी अहवालातले महत्त्वाचे मुद्दे सीएनएन-आयबीएनच्या हाती लागलेत. इंडियन मुजाहिद्दीनला पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा असलेल्या आयएसआयकडूनच सर्व निधी पुरवला जातो, तसंच IMचं ISI यच व्यवस्थापनही बघते अशी कबुली भटकळनं दिलीय. या अगोदरही पाकिस्तान गुप्तचर यंत्रणेनं आरोप करण्यात आले होते मात्र नेहमी प्रमाणे पाकने सर्व आरोप फेटाळून लावले. आता अटकेत असलेल्या भटकळने कबुली दिलीय. 2007 पासून भारतात झालेल्या 10 मोठ्या बॉम्बस्फोटांमध्ये इंडियन मुजाहिद्दीनचा प्रत्यक्ष सहभाग असल्याची कबुलीही भटकळनं दिलीय. यासीन भटकळला बिहारमधून अटक करण्यात आली. त्याची एनआयए कोठडी वाढवण्यात आलीय. त्याच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे समोर येत आहे. त्याने या अगोदर वाराणसी आणि हैदराबाद बाँम्बस्फोटात सहभाग असल्याचं कबूल केलंय. तसंच दोनच दिवसांपूर्वी त्याने मुंबईतील झवेरी बाजार साखळी स्फोट प्रकरणी चुकींच्या आरोपींना अटक करण्यात आली असा दावा केलाय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.