04 सप्टेंबर : लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपावरून अटकेत असलेल्या आसाराम बापूचा जामीन अर्जावरचा निर्णय जोधपूर कोर्टाने राखून ठेवलाय. पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार त्यांच्याकडे आसारामविरोधात भक्कम पुरावा आहे. पोलिसांनी जोधपूरच्या डीसीपींना धमकी देणारं पत्र मिळालं असल्याचही कोर्टात सांगितलं. आसारामच्या वकिलानं मात्र पीडित मुलगी ही अल्पवयीन नसल्याचा दावा केलाय. आसारामला तब्येतीच्या कारणावरून जामिनावर सोडण्यात यावं अशी विनंती त्याच्या वकिलांनी केली होती. शुक्रवारी मध्यरात्री आसाराम बापूला अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर 3 दिवस पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. सोमवारी आसाराम बापूला कोर्टासमोर हजर करण्यात आले. कोर्टाने बापूला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आणि तुरुंगात रवानगी केली. तुरुंगातून लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी बापूने जामीन अर्ज दाखल केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







