08 फेब्रुवारी : आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे वादात सापडलेले बीसीसीआय अध्यक्ष एन श्रीनिवासन यांची आता आयसीसीच्या कार्याध्यक्षपदी निवड झाली आहे.
आयसीसीच्या वर्किंग कमिटीने यासंदर्भात आज (शनिवारी) निर्णय घेतलाय. आयसीसीमध्ये सध्या बदलाचे वारे वाहत आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आयसीसीला कार्याध्यक्ष असावा हा ठराव संमत झाला होता.
त्यापदी आता श्रीनिवासन यांची वर्णी लागली आहे. आयसीसीच्या कामाच्या पद्धतीत, स्पर्धांमध्ये आणि आर्थिक व्यवहारांत बदल करण्याचे बोर्डाचे संकेत आहेत.
जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.