31 मे : लोकसभा निवडणुकीत सपाटून पराभवाला सामोरं गेलेल्या आम आदमी पक्षाला आज मोठा हादरा बसला. पक्षाचे महत्वाचे नेते योगेंद्र यादव यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. योगेंद्र यादव यांनी हरियाणामध्ये झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
यादव यांनी आपला राजीनामा पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्याकडे सोपवला आहे. पण त्यांचा राजीनामा केजरीवाल यांनी अजून स्वीकारलेला नाही. हरियाणा मतदारसंघातून खुद्द योगेंद्र यादव यांनी निवडणूक लढवली होती. मात्र तिथे त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. आपण सर्व पदाचा राजीनामा जरी दिला असला तरी एक कार्यकर्ता म्हणून काम करत राहणार असं यादव यांनी स्पष्ट केलं.
त्यांच्यापाठोपाठ हरियाणा येथील पक्षाचे नेते नवीन जयहिंद यांनीही सर्व पदाचा राजीनामा दिला आहे. नवीन जयहिंद आणि योगेंद्र यादव यांच्यात मतभेद होते त्यामुळे हरियाणामध्ये पक्षाचा पराभव झाला. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी आपले राजीनामे केजरीवाल यांच्याकडे सुपूर्द केले आहे. योगेंद्र यादव पक्षासाठी आधार आहे ते त्यांच्यापदावर कायम राहतील त्यांचा राजीनामा स्वीकारला जाणार नाही असं पक्षाचे नेते संजय सिंह यांनी स्पष्ट केलं.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++