22 फेब्रुवारी : पुरेशी माहिती नसली आणि उगीच कोटी करण्याचा प्रयत्न केला तर ते कसं बॅकफायर होऊ शकतं याचा अनुभव सध्या शोभा डे घेतायत. कारण त्यांनी काल मतदान केलं, त्याचा सेल्फी टाकला पण सोबतच एका ढेरीवाल्या पोलीसाचा फोटोही टाकला. सोबत हेवी पोलीस बंदोबस्त असं लिहिलं आणि ट्विट केलं. आता शोभा डेंना हा पोलीस कुठे कसा सापडला काय माहित किंवा त्यांनी तो नेटवरनं ढापला आणि उगीच शान मारण्यासाठी तो ट्विट केला काय माहीत? पण हा पोलीस महाराष्ट्र पोलीसच नाहीय.
We love puns too Ms De but this one is totally imisplaced. Uniform/official not ours. We expect better from responsible citizens like you. https://t.co/OcKOoHO5bX
— मुंबई पोलीस - Mumbai Police (@MumbaiPolice) February 21, 2017
मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलनं शोभा डेंना रिप्लाय केलं. आम्हालाही कोट्या केलेल्या आवडतात पण तुमची कोटी यावेळेस चुकलीय कारण हा पोलीस आमचा नाहीच. त्याचा गणवेश बघा असा सल्लाही मुंबई पोलीसांनी शोभा डेंना दिलाय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv