24 नोव्हेंबर : आंबेडकरी चळवळीत आता आणखी एक फूट पडण्याची शक्यता आहे. प्रसिद्ध साहित्यिक आणि रिपब्लिकन नेते अर्जुन डांगळे नवा पक्ष स्थापन करण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष असं डांगळेंच्या नवीन पक्षाचं नाव असू शकतं. विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेचा संसार मोडल्यानंतर घटक पक्षांनी भाजपच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. शिवसेनेनं रामदास आठवले यांना उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती पण तरीही रामदास आठवले यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. भाजपसोबत जाण्यावरुन डांगळेंचे रामदास आठवलेंसोबत मतभेद झाले होते.त्यांच्या निर्णयाला डांगळे यांनी विरोध केला होता. एवढंच डांगळे यांनी आरपीआयच्या आठवले गटाला रामराम ठोकत डांगळे शिवसेनेच्या कंपूत दाखलही झाले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचा प्रचारही केला होता. त्यामुळे आता डांगळे यांनी आपला स्वत:चा नवा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++