12 फेब्रुवारी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या विरोधात एल्गार पुकारलाय. केंद्र सरकारनं भूसंपादन कायद्यात केलेल्या सुधारणांच्या विरोधात अण्णा हजारे नवी दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन करणार आहेत. सुधारित भूसंपादन कायदा शेतकर्यांच्या विरोधात आहे, तो अंमलात आणला तर देशातली सामान्य जनता भरडली जाईल, शेतकरी उद्ध्वस्त होतील आणि परदेशी कंपन्या, तसंच कॉर्पोरेट लॉबीचा फायदा होईल असा आक्षेप अण्णांनी घेतलाय. याविरोधात जनजागृती करण्यासाठी 24 फेब्रुवारीला एक दिवसांचं लाक्षणिक उपोषण करणार आहे. ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++