23 ऑक्टोबर : देशभरात वाढत चाललेल्या असहिष्णुतेविरोधात साहित्यिक आणि लेखकांनी पुरस्कार परत देण्याचं आंदोलन छेडलंय. आज राज्यातील साहित्यिकांनी आपले पुरस्कार रक्कमेसह परत करण्यासाठी मंत्रालय गाठले. साहित्यिक आणि लेखिका प्रज्ञा दया पवार, गणेश विसपुते, शाहीर संभाजी भगत, हरिश्चंद्र थोरात, मिलिंद मालशे, उर्मिला पवार, येशू पाटील, मुकुंद कुळे या साहित्यिकांनी पुरस्कार परत केले.
राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री कार्यालयातील वरिष्ठ अधिकार्यांनी हे पुरस्कार देखील स्वीकारले आहे. दादरी प्रकरणी, डॉ.कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी देशभरातील साहित्यिकांनी पुरस्कार परत केले आहे. राज्यात प्रज्ञा दया पवार यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहुन पुरस्कार परत करण्याची घोषणा केली. त्यांच्यापाठोपाठ शाहीर संभाजी भगत यांनी पुरस्कार परत करणार असल्याचं जाहीर केलं होतं.
दरम्यान आज दिल्लीत लेखक रस्त्यावर उतरले होते. साहित्य अकादमीविरोधात लेखकांनी मोर्चा काढला. कलबुर्गी आणि दादरीप्रकरणी हे आंदोलन करण्यात आलं. श्रीराम सेंटरपासून साहित्य अकादमीपर्यंत साहित्यिकांनी तोंडावर काळी पट्टी बांधून मोर्चा काढला. कलबुर्गी हत्येप्रकरणी आणि दादरीप्रकरणी साहित्य अकादमीने चकार शब्दही न काढल्यानं साहित्यिक नाराज आहेत. या नाराजीतून जवळपास 40 साहित्यिकांनी आपले साहित्य अकादमी पुरस्कार परत केले आहेत. या पार्श्वभूमीवर साहित्य अकादमीची महत्वाची बैठक होणार आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++