26 ऑक्टोबर : पुणे विमानतळावर दुबईहुन आलेल्या स्पाईसजेटच्या विमानात स्वच्छतागृहात लपवलेले तब्बल पावणेतीन कोटी रूपये किमतीचं तीन किलो सोनं कस्टम विभागाने पकडलंय. पुणे कस्टम विभागाची ही आजवरची सगळ्यात मोठी कारवाई आहे.
हे सोनं तस्करी करून बेंगलोरला नेणार असल्याची शक्यता कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. सोन्याच्या लगडी असलेल्या स्वरूपातलं हे सोन प्लास्टिक बॅगमध्ये गुंडाळून विमानातल्या स्वच्छतागृहामध्ये खाचा करून लपवण्यात आलं होतं. विमानाची तपासणी करत असताना ते आढळून आल्याने कस्टम विभागाने हे सोनं ताब्यात घेतलंय. या प्रकरणात कुणाचा सहभाग आहे याचा तपास कस्टम विभागाकडून सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.