11 जुलै : सोलापूरचा गिर्यारोहणवेडा आनंद बनसोडे जगाची सर्वोच्च सात शिखरं पादाक्रांत करणार आहे. जगाच्या सातही खंडांमधली सर्वाधिक उंच शिखरं पादाक्रांत करण्याच्या मोहिमेसाठी आनंदची निवड झाली आहे.
‘वर्ल्ड पीस सेव्हन समिट’ असं या मोहिमेचं नाव आहे. या मोहिमेच्या माध्यमातून अनाथ मुलं आणि स्त्रियांच्या शिक्षणाचं कार्यही उभं राहणार आहे. गरीब कुटुंबातून आलेल्या आनंद बनसोडेने आजवर जिद्दीच्या जोरावर माऊंट एव्हरेस्टसह अनेक उंच शिखरं सर केली आहेत. मोहिमा पूर्ण करण्यासाठी त्याला सोलापूर आणि पुणे- मुंबईच्या मित्रपरिवाराने मदत केल्यानं त्यांचे आभारही आनंदनं मानले आहेत.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++