जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / सूरज परमार आत्महत्येप्रकरणी अखेर चारही नगरसेवकांची शरणागती

सूरज परमार आत्महत्येप्रकरणी अखेर चारही नगरसेवकांची शरणागती

सूरज परमार आत्महत्येप्रकरणी अखेर चारही नगरसेवकांची शरणागती

05 डिसेंबर : ठाण्यातील बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणातले चारही आरोपी नगरसेवर आज अखेर पोलिसांना शरण आले आहेत. आज सकाळी 9 च्या सुमारास ठाण्यातल्या कापुरबावडी एसीपी कार्यालयात या चौघांनी पोलिसांसमोर शरणागती पत्कारली. त्यानंतर पोलिसांनी या चौघांच्या अटकेची प्रक्रिया पूर्ण केली आणि वैद्यकीय तपासणीसाठी नेलं जाणार आहे. दुपारी 2 वाजता त्यांना कोर्टासमोर हजर केलं जाईल. जाहिरात तपासा दरम्यान पोलिसांना परमार यांची एक 16 पानी चिट्ठी मिळाली ज्यात काही नावे खोडण्यात आली होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

    suraj parmar 05 डिसेंबर : ठाण्यातील बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणातले चारही आरोपी नगरसेवर आज अखेर पोलिसांना शरण आले आहेत. आज सकाळी 9 च्या सुमारास ठाण्यातल्या कापुरबावडी एसीपी कार्यालयात या चौघांनी पोलिसांसमोर शरणागती पत्कारली. त्यानंतर पोलिसांनी या चौघांच्या अटकेची प्रक्रिया पूर्ण केली आणि वैद्यकीय तपासणीसाठी नेलं जाणार आहे. दुपारी 2 वाजता त्यांना कोर्टासमोर हजर केलं जाईल.

    जाहिरात

    तपासा दरम्यान पोलिसांना परमार यांची एक 16 पानी चिट्ठी मिळाली ज्यात काही नावे खोडण्यात आली होती. सदर चिट्ठी चे फोरेन्सिक पडताळणी करताच त्यात मनसेचे नगरसेवक सुधाकर चव्हाण, राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला, हणमंत जगदाळे आणि काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांची नावं समोर आली होती. हे चारही नगरसेवक अखेर शरण आले आहे. या अटकेच्या कारवाईवेळी या नगरसेवकांच्या समर्थकांकडून काही गडबड होऊ नये, यासाठी पोलिसांनी क़डकोट बंदोबस्त ठेवला होता. या नगरसेवकांना आता अटक झाल्याने त्यांचं नगरसेवकपदही धोक्यात येऊ शकतं. पण त्यांनी पालिकेकडे आजारपणाचा अर्ज दाखल केला तर त्यांचं नगरसेवक पद तात्पुरतं वाचू शकतं.

    आता या परमार प्रकरणाचा घटनाक्रम - 7 ऑक्टो. 2015- बिल्डर सूरज परमार यांची घोडबंदर रोड इथल्या साईटवर गोळ्या झाडून आत्महत्या - तपासादरम्यान पोलिसांना 16 पानी सुसाईड नोट मिळाली - या चिठ्ठीतली काही नावं खोडण्यात आली होती - या चिठ्ठीची फॉरेन्सिक तपासणी झाली - चिठ्ठीत सुधाकर चव्हाण, नजीब मुल्ला, हणमंत जगदाळे, विक्रांत चव्हाण या नगरसेवकांची नावं असल्याचं उघड - चारही नगरसेवक फरार झाले - अंतरिम जामिनासाठी चौघांचा अर्ज दाखल पण ठाणे कोर्टाने अर्ज फेटाळून लावला - तरी सुद्धा आरोपींची उच्च न्यायालयात धाव, पण उच्च न्यायालयानेही अर्ज फेटाळला - सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करा किंवा पोलिसांना शरण येण्याचा पर्याय उच्च न्यायालयानं दिला - अखेर 5 डिसेंबर 2015ला चारही आरोपींची शरणागती - परमार यांची आणखी एक डायरी पोलिसांच्या हाती - डायरीत अनेक बड्या नेत्यांना पैसे दिल्याचा उल्लेख - पोलीस या बड्या नेत्यांना अटक करणार का ?

    ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

    Follow @ibnlokmattv

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात