जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / सूरज परमार आत्महत्या प्रकरण : दोषींवर योग्य ती कारवाई करू - मुख्यमंत्री

सूरज परमार आत्महत्या प्रकरण : दोषींवर योग्य ती कारवाई करू - मुख्यमंत्री

सूरज परमार आत्महत्या प्रकरण : दोषींवर योग्य ती कारवाई करू - मुख्यमंत्री

18 डिसेंबर : ठाण्यातील बिल्डर सूरज परमार यांच्या आत्महत्या प्रकरणी गरज पडल्यास आरोपींविरूद्ध मोक्काही लावला जाईल, आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवारी) विधानसभेत दिलं आहे. सूरज परमार आत्महत्येसंदर्भात सभागृहात लक्षवेधी चर्चा झाली. यावेळी सभागृहात गोल्डन गँग आणि जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देतांना मुख्यमंत्र्यांनी दोषींवर योग्य ती कारवाई करू, असं आश्वासन दिलं. यावेळी भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी सभागृहात, कोणत्या लोकप्रतिनिधीच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले, असा प्रश्न विचारला.

  • -MIN READ
  • Last Updated :

    suraj parmar 18 डिसेंबर :  ठाण्यातील बिल्डर सूरज परमार यांच्या आत्महत्या प्रकरणी गरज पडल्यास आरोपींविरूद्ध मोक्काही लावला जाईल, आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवारी) विधानसभेत दिलं आहे. सूरज परमार आत्महत्येसंदर्भात सभागृहात लक्षवेधी चर्चा झाली. यावेळी सभागृहात गोल्डन गँग आणि जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देतांना मुख्यमंत्र्यांनी दोषींवर योग्य ती कारवाई करू, असं आश्वासन दिलं. यावेळी भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी सभागृहात, कोणत्या लोकप्रतिनिधीच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले, असा प्रश्न विचारला. त्यावरून सदस्यांनी सभागृहात गोंधळ घातला. गोंधळ कमी झाल्यावर फडणवीस यांनी जितेंद्र आव्हाडांचे नाव घेतलं. पण त्यांच्याविरुद्ध सध्या कोणताही गुन्हा दाखल झालेला नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. तसंच पुराव्याशिवाय कुणाचही नाव यात गोवलं जाणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. जितेंद्र आव्हाडांबाबत या प्रकरणी माहिती येत आहे. ती तपासून पुढची कारवाई करू असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. तसंच चर्चेतील गोल्डन गँगच्या उल्लेखाला उत्तर देताना दोषी आढळणार्‍यांचे कंबरडे मोडल्याशिवाय सरकार राहणार नाही, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

    ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

    Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात