10 मे : घरकुल घोटाळ्या प्रकरणी सुरेश जैन यांना वाचवण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी केलाय. घरकुल घोटाळ्याचा खटला कमकुवत करण्यासाठी वकील निर्मलकुमार सुर्यवंशी आणि प्रदीप चव्हाण यांची बदली केली असंही अण्णा म्हणाले.राळेगणसिद्धीमध्ये अण्णांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे भ्रष्टाचारी नाहीत असे लोकं सांगतात पण त्यांच्यावर शरद पवार आणि त्यांच्या सहकार्यांचा दबाव आहे. या दबावाला बळी पडणे आणि भ्रष्टाचार्यांना अशा प्रकारे पाठीशी घालण्याचा प्रकार हा भ्रष्टाचार नाही का ? असा सवाल अण्णांनी विचारला.
तसंच मर्जीतले वकील नेमण्यासाठी सरकारच प्रयत्न करत असल्याचा आरोपही अण्णांनी मुख्यमंत्र्यांवर केला. जे सावंत आयोगाला सापडले नाही ते या वकिलांना सापडले त्यामुळे सुरेश जैन यांचा घोटाळा बाहेर आला असंही अण्णांनी म्हणाले. देशात लाट कुणाचीही असली तरी मोदी, राहुल गांधी किंवा केजरीवाल यांचे पक्ष देशाला प्रगतीकडे नेणार नाहीत असं मतही अण्णांनी व्यक्त केलं.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++