प्रफुल्ल साळुंखे, नागपूर09 डिसेंबर : राज्य सरकारनं आपल्या गतीशिलतेची चुणुक दाखवली. एका शेतकर्याला तब्बल 38 लाख रुपयांची सबसीडी केवळ काही तासांत उपलब्ध करुन दिलीय. एकनाथराव गणपतराव खडसे असं या भाग्यशाली शेतकर्याचं नाव आहे... हो! तुमचा अंदाज बरोबर आहे, ते दुसरे तिसरे कोणी नसून राज्याचे कृषीमंत्री आहेत.
एकनाथराव गणपतराव खडसे... मुक्ताईनगरचा एक सामान्य शेतकरी... या शेतकर्याने सबसीडीसाठी अर्ज केला आणि या शेतकर्याला अनुदान देण्यासाठी प्रशासन वेगानं कामाला लागलं. काही दिवस नव्हे, महिने नव्हे तर काही तासांतच हरितगृह उभारणीसाठी मिळणारं अनुदान या शेतकर्याच्या बँकेत जमाही झालं.
खडसेंवर मेहरबानी का?
शेतकर्याचं नाव : एकनाथ गणपतराव खडसे, कृषीमंत्री
मुक्काम - कोथळी, मुक्ताईनगर
गुलाब लागवड आणि ग्रीन हाऊससाठी अनुदान
कर्ज प्रकरण सादर केल्याची तारीख 5-5-2014
कर्ज वितरण केल्याची तारीख 5-5-2014
बँकेचं आरटीजीएस (पैसे हस्तांतर होणे) 5-5-2014
प्रकल्प उभारणी सुरू केल्याचा दिनांक 10-5-2014
अर्जावर अधिकार्याची सही नाही
अनेक परवानगी अर्ज करताना तारखांचा उल्लेख नाही
याच भागातील अशोक मोरेश्वर, पुजाजी किसन झोपे, अरुण रायपुरे यांनी फलोत्पादन सबसीडी मिळावी म्हणून 2013 -14 ला अर्ज केलाय. एक वर्ष लोटलं तरीही या शेतकर्यांची फाईल जागची हलली नाही. राज्यात बस पाससाठी शेतकर्यांची मुलगी आत्महत्या करते. शेतकर्यांच्या आत्महत्या खरी की खोटी सिद्ध करण्यासाठी नातेवाईक प्रशासनाचे उंबरठे झिजवताय. पण, फाईली हलत नाही. मात्र, खडसे यांना 38 लाखांची सबसीडी देण्यासाठी गतिशिलतेनं कामाला लागलं. तीच गतिशिलता सरकारनं इतर शेतकर्यांबाबत जरी दाखवली तरी शेतकरी आत्महत्येचा आकडा निश्चितच खाली येईल.
या शेतकर्यांना अनुदान कधी ?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.