13 मे : लोकसभा निवडणुकीचं मतदान संपलं, पोस्ट पोल सर्व्हे आले आणि या सर्व्हेमध्ये भाजपप्रणित एनडीए बहुमत मिळवेल असं दाखवण्यात आलं. यानंतर आता भाजपच्या गोटात वेगाने घडामोडी घडायला सुरुवात झालीय.
भाजपचे वरिष्ठ नेते उद्या (बुधवारी) गांधीनगरमध्ये बैठक घेत आहेत. त्यासाठी हे नेते गुजरातमध्ये दाखलही झाले आहेत. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग, अरुण जेटली आणि नितीन गडकरी हे बैठकीला हजर असणार आहे.
त्यामुळे सरकार स्थापना आणि त्यानिमित्ताने पक्षसंघटनेत होणारे फेरबदल, याची चर्चा या बैठकीत होईल. दरम्यान, गडकरींनी सोमवारी नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर आज सकाळी लालकृष्ण अडवाणी आणि दुपारी राजनाथ सिंह यांची भेट घेतली. त्यामुळे मोदींच्या कॅबिनेटमध्ये राजनाथ सामिल झाले तर भाजपचे अध्यक्ष गडकरी होतील, अशी चर्चा सुरू झालीय. गडकरी यांनी मात्र याचा इन्कार केलाय.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
[if0] | Follow @ibnlokmattv[sc0] |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Narendra modi, NDA, Post-poll survey