14 ऑक्टोबर : वाढत्या असहिष्णुतेविरोधात साहित्यिकांनी पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतलाय. आज लोकशाहीर संभाजी भगत यांनीही शासनाचा पुरस्कार रक्कमेसह परत करण्याचा निर्णय घेतला आहे.
समाजात अलीकडे ज्या हिंसक घटना घडतायत, त्याच्याबद्दल सत्ताधार्यांकडून साधं दुःखही व्यक्त होत नाहीय, याचं आपल्याला वाईट वाटतंय, असं भगत यांचं म्हणणं आहे. पुरस्कार परत करून आपण सरकारचा निषेध करत असल्याचंही ते म्हणाले. अलीकडेच त्यांना ‘नागरिक’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार त्यांना देण्यात आला होता. काल मंगळवारीच लेखिका प्रज्ञा दया पवार यांनीही रक्कमेसह पुरस्कार परत केलाय. तसंच कवी गणेश विसपुते यांनीही आज राज्य सरकारचे सगळे पुरस्कार परत केले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवर होणारे हल्ले आणि विचारवंतांच्या होणार्या हत्या, याविरोधात निषेध म्हणून त्यांनी हे पाऊल उचललंय.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++