24 डिसेंबर : मुंबई बॉम्बस्फोट स्वत:जवळ शस्त्र बाळगल्या प्रकरणी येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त बुधवारी दुपारी मुंबईकडे रवाना झाला. संजय दत्तला जेल प्रशासनाने 14 दिवसांची फर्लो मंजूर केली आहे. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर संजय दत्त कारागृहातून बाहेर पडला. येरवडा कारागृहाच्या मागच्या दरवाज्यातून तो बाहेर पडला आणि लगेचच मुंबईकडे रवाना झाला.
सुप्रीम कोर्टने संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यापैकी 18 महिने शिक्षा त्याने पूर्वी भोगली आहे. मे 2013 पासून उर्वरीत शिक्षा भोगण्यासाठी तो पुन्हा जेलमध्ये गेला. पण, या शिक्षेत, संजय दत्तने आतापर्यंत वारंवार सुट्टी घेतली आहे. शिक्षेचा विशिष्ट कालावधी पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही कैद्याला 14 दिवसांची फर्लो रजा दिली जाते. त्यामध्ये आणखी 14 दिवस मुदतवाढ मिळू शकते. संजय दत्तने काही दिवसांपूर्वी फर्लो रजेसाठी जेल प्रशासनाकडे अर्ज केला होता. राज्याचे पोलिस महासंचालकांनी हि रजा मान्य केली आहे. त्यामुळे संजय दत्तला आता ख्रिसमस आणि न्यू इयर आपल्या कुटुंबीयांसोबत घालवता येणार आहे. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++