14 ऑक्टोबर : 1993 बॉम्बस्फोटातील प्रकरणी दोषी अभिनेता संजय दत्त याला आणखी 14 दिवसांची संचित रजा मंजूर झालीय. संजय दत्त 1 ऑक्टोबर रोजी 14 दिवसांच्या पॅरोल रजेवर बाहेर आला. रजा संपत येत असताना शनिवारी संजयने आपली प्रकृती चांगली नसून आणखी 14 दिवसांची रजा मिळावी यासाठी त्याने कारागृह प्रशासनाकडे अर्ज केला होता. त्याची कारागृहातलं वर्तन आणि प्रकृतीचं कारण बघता त्याला दुसर्यांदा ही रजा मंजूर करण्यात आली आहे. संजय पुण्याच्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. 1993 बॉम्बस्फोट प्रकरणी अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला पाच वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली त्यापैकी त्याने या अगोदर 18 महिन्यांची शिक्षा भोगलीय उर्वरीत 3 वर्षांची शिक्षा येरवडा कारागृहात भोगत आहे. पाच महिन्यानंतर संजय दत्त 1 ऑक्टोबर रोजी पॅरोलवर 14 दिवसांची सुट्टी घेऊन बाहेर आला. आता तब्येतीच्या कारणास्तव संजय दत्तला आणखी 14 दिवसांची सुट्टी मिळालीय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.