पुणे – 25 फेब्रुवारी : 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बॉलीवूड अभिनेता संजय दत्तची आज (मंगळवारी) कारागृहातून कायमची सुटका झाली. पुणे विमानतळावरून चार्टर्ड विमानाने मुंबईत दाखल झाला आहे.
संजय दत्त सर्वप्रथम सिद्धिविनायक गणपतीच्या दर्शनाला जाणार आहे. तिथून मुंबईतील बडा कब्रस्तानमधील आई नर्गिस दत्त यांच्या समाधीचं दर्शन घेऊन तो निवासस्थानी परतेल.
WATCH: Actor Sanjay Dutt released from Pune’s Yerwada Central Jail in the 1993 Mumbai bomb blasts case https://t.co/Rt5kH3VD4I
— ANI (@ANI_news) February 25, 2016
21 मे 2013पासून संजय दत्त येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. चांगल्या वर्तवणुकीमुळे त्याची काही दिवसांची शिक्षा माफ करण्यात आली. दरम्यानच्या काळात तो फर्लो आणि पॅरोलच्या रजेवर तो अनेकदा कारागृहाबाहेर आला होता. त्यानंतर अखेर आज संजय दत्त कायमचा सुटला. कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याने तिरंग्याला सलाम ठोकला. ‘आजादी इतनी आसान नही’, अशी प्रतिक्रिया संजयने या वेळी दिली. संजुबाबाच्या स्वागतासाठी दिग्दर्शक राजकुमार हिरानी आणि त्यांच्या टिममधील काही जण उपस्थित होते.
चांगली वर्तणूक या निकषाखाली संजय दत्तची तब्बल 8 महिन्यांची सजा माफ झालीय. पण म्हणूनच या शिक्षेदरम्यान काय काही कमी सुट्या मारलेल्या नाहीत. पॅरोलच्या नावाखाली संजूबाबा तब्बल 146दिवस बाहेर होता. पण नियमानुसार सर्व कारवाई पूर्ण झाल्याची माहिती कारागृह प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, माध्यम प्रतिनिधी आणि प्रचंड गर्दीतून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत संजयला पुणे विमानतळावर नेण्यात आलं. संजय दत्तच्या वांद्रे इथल्या निवासस्थानी त्याच्या चाहत्यांची मोठी गर्दी होण्याची शक्यता पाहता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे, असे पोलीस विभाकडून सांगण्यात आले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv

)







