17  नोव्हेंबर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज चौथा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने शिवतीर्थावर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेण्यासाठी राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांची रीघ लागण्याची शक्यता आहे. काही वेळा पूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुटुंबासह बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं. तर दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. शिवसेनाप्रमुख ठाकरे यांचे निधन 17 नोव्हेंबर 2012 रोजी झालं होतं. दरम्यान, शिवाजी पार्कवर बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी येणाऱ्या शिवसैनिकांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







