04 फेब्रुवारी : जर तुम्ही एखाद्या व्हॉटसऍप ग्रुपचे ऍडमिन असाल तर आता तुम्हाला तुमच्या ग्रुप सदस्यांची संख्या वाढवण्यासाठी व्हॉटसऍपने नामीसंधी उपलब्ध करून दिलीये. कारण आता व्हॉटसऍप ग्रुपची मर्यादा 100 वरुन 256 इतकी करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे तुम्ही नुसते 100 नाहीतर 256 सदस्यांना ग्रुपमध्ये सहभागी करू शकता. व्हॉटसऍपवर ही सुविधा सुरूही झालीये.
या पूर्वी व्हॉटसऍपवर ब्रॉडकास्टिंगसाठी 256 इतकी मर्यादा होती. म्हणजे तुम्ही एकाच वेळी 256 जणांना एकच मेसेज पाठवू शकत होता. पण, ग्रुपसाठी ही सदस्य ऍड करण्यासाठी 50 इतकीच मर्यादा होती. नंतर ती 100 इतकी करण्यात आलीये. पण, व्हॉटसऍपचा वाढत वापर आणि उपभोगत्यांची संख्या पाहता व्हॉट्सऍपने 100 ची मर्यादा वाढवली आहे. त्यामुळे आता ग्रुप ऍडमिन 256 जणांना आपल्या ग्रुपमध्ये ऍड करू शकतो.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.