जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / विनोदी लेखक वि.आ.बुवा यांचं निधन

विनोदी लेखक वि.आ.बुवा यांचं निधन

विनोदी लेखक वि.आ.बुवा यांचं निधन

17 एप्रिलप्रसिद्ध विनोदी लेखक वि.आ.बुवा यांचं आज सकाळी कल्याणमध्ये निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. त्यांची 150 पेक्षाही जास्त पुस्तकं प्रकाशित आहेत. पंढरपूरमधील एका सनातनी कुटुंबात 2जुलै 1926 रोजील बुवा यांचा जन्म झाला. व्हीजेटीआयच्या तांत्रिक रसायनशास्त्र विभागात त्यांनी 42 वर्ष नोकरी केली. इंदुकला या नावाने प्रसिद्ध होणार्‍या हस्तलिखितात त्यांचं सुरुवातीचं साहित्य प्रकाशित झालं. अकलेचे तारे हा त्यांचा पहिला कथासंग्रह 1953 साली प्रकाशित झाला. एक ना धड, चौदावे रत्न, बिल दिया दर्द लिया, शंभरावं पुस्तक असे कथासंग्रह प्रसिद्ध. तसेच आकाशवाणीवरच्या श्रुतिका, विनोदी निबंध,पटकथा, तमाशांच्या संहिता, विडंबनं, एकांकिका असं साहित्य त्यांनी हाताळलं. विविध मानवी स्वभावाची नमुने आणि लकबी टिपणारी निरीक्षण शक्ती, कल्पकता आणि उत्स्फूर्त विनोद ही बुवा यांच्या लेखनाची वैशिष्ट्य.

  • -MIN READ
  • Last Updated :

    17 एप्रिल

    प्रसिद्ध विनोदी लेखक वि.आ.बुवा यांचं आज सकाळी कल्याणमध्ये निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. त्यांची 150 पेक्षाही जास्त पुस्तकं प्रकाशित आहेत. पंढरपूरमधील एका सनातनी कुटुंबात 2जुलै 1926 रोजील बुवा यांचा जन्म झाला. व्हीजेटीआयच्या तांत्रिक रसायनशास्त्र विभागात त्यांनी 42 वर्ष नोकरी केली.

    इंदुकला या नावाने प्रसिद्ध होणार्‍या हस्तलिखितात त्यांचं सुरुवातीचं साहित्य प्रकाशित झालं. अकलेचे तारे हा त्यांचा पहिला कथासंग्रह 1953 साली प्रकाशित झाला. एक ना धड, चौदावे रत्न, बिल दिया दर्द लिया, शंभरावं पुस्तक असे कथासंग्रह प्रसिद्ध. तसेच आकाशवाणीवरच्या श्रुतिका, विनोदी निबंध,पटकथा, तमाशांच्या संहिता, विडंबनं, एकांकिका असं साहित्य त्यांनी हाताळलं. विविध मानवी स्वभावाची नमुने आणि लकबी टिपणारी निरीक्षण शक्ती, कल्पकता आणि उत्स्फूर्त विनोद ही बुवा यांच्या लेखनाची वैशिष्ट्य.

    जाहिरात
    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात