जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / विद्यापीठाच्या G.S.निवडणुकीत विद्यार्थ्यांना धमक्या,लाच !

विद्यापीठाच्या G.S.निवडणुकीत विद्यार्थ्यांना धमक्या,लाच !

विद्यापीठाच्या G.S.निवडणुकीत विद्यार्थ्यांना धमक्या,लाच !

उदय जाधवसह अलका धुपकर, मुंबई 06 जानेवारी : मुंबई विद्यापीठाच्या स्टुडंट काऊन्सिलची निवडणूक सध्या विद्यार्थी मतदारांना मिळणार्‍या धमक्या आणि दाखवली जाणारी प्रलोभनं यामुळे वादात सापडली आहे. तर याप्रकरणी संबंधित कॉलेजनी विद्यार्थ्यांना संरक्षण द्यावं असं म्हणत विद्यापीठानं याप्रकरणी हात झटकले आहे. मुंबई विद्यापीठाची स्टुडंट काऊन्सिलची निवडणूक नेहमीच रंगतदार ठरलीये. पण त्याचबरोबर या निवडणूकीला वादाची किनारही लाभलीये. यावेळीही ही निवडणूक वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. या निवडणुकीत मतदान करणार्‍या विद्यार्थी मतदरांना धमक्या आणि प्रलोभनं दिली जात असल्याचा आरोप या विद्यार्थांनी केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    mumbai universty election34345 उदय जाधवसह अलका धुपकर, मुंबई

    06 जानेवारी : मुंबई विद्यापीठाच्या स्टुडंट काऊन्सिलची निवडणूक सध्या विद्यार्थी मतदारांना मिळणार्‍या धमक्या आणि दाखवली जाणारी प्रलोभनं यामुळे वादात सापडली आहे. तर याप्रकरणी संबंधित कॉलेजनी विद्यार्थ्यांना संरक्षण द्यावं असं म्हणत विद्यापीठानं याप्रकरणी हात झटकले आहे. मुंबई विद्यापीठाची स्टुडंट काऊन्सिलची निवडणूक नेहमीच रंगतदार ठरलीये. पण त्याचबरोबर या निवडणूकीला वादाची किनारही लाभलीये. यावेळीही ही निवडणूक वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. या निवडणुकीत मतदान करणार्‍या विद्यार्थी मतदरांना धमक्या आणि प्रलोभनं दिली जात असल्याचा आरोप या विद्यार्थांनी केला आहे.

    युवा सेनेनं माघार घेतल्यानंतर मनविसे आणि एनएसयुआय (NSUI) एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. पण राजकीय पक्षांशी संलग्न असणार्‍या या संघटनांनी विद्यार्थ्यांच्या या दाव्याचं खंडन केलंय. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी शाखेने मात्र या निवडणुकीत खूप गैरप्रकार होत असल्याचा आरोप करत निवडणुकाच रद्द करण्याची मागणी केली आहे. जी.एस. बनलेल्या 14 विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी ही कॉलेजची असल्याचं विद्यापीठानं म्हटलं आहे राज्यात अजूनही विद्यापीठातल्या निवडणुका थेट होत नाहीत. हिंसा होते, हे कारण देत थेट निवडणुकांवर बंदी घातल्यामुळे आता अप्रत्यक्ष निवडणुका होता. पण एकीकडे राष्ट्रवादीने थेट निवडणुका पुन्हा सुरू करण्याची मागणी केली असतानाच, अप्रत्यक्ष निवडणुकाही वादात सापडल्या आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात