जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / विजय पांढरे उतरणार राजकारणाच्या आखाड्यात

विजय पांढरे उतरणार राजकारणाच्या आखाड्यात

विजय पांढरे उतरणार राजकारणाच्या आखाड्यात

30 नोव्हेंबर : ज्यांच्या पत्रामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपल्या पदावरुन काही काळ पायउतार व्हावे लागले होते ते विजय पांढरे आता राजकारणाच्या आखाड्यात उतरणार आहे. जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय पांढरे आज सेवानिवृत्त होणार आहेत. आणि उद्या रविवारी ते आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत. आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पक्षात येण्याचं निमंत्रण दिलंय. पांढरेंनी याला होकार दिलाय. राज्यात सध्या जे दोन आघाडीचे पक्ष आहे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहे, त्यामुळे आपण आम आदमीत प्रवेश करत आहोत असं पांढरे यांनी स्पष्ट केलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

    30 नोव्हेंबर : ज्यांच्या पत्रामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपल्या पदावरुन काही काळ पायउतार व्हावे लागले होते ते विजय पांढरे आता राजकारणाच्या आखाड्यात उतरणार आहे. जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय पांढरे आज सेवानिवृत्त होणार आहेत. आणि उद्या रविवारी ते आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत. आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पक्षात येण्याचं निमंत्रण दिलंय. पांढरेंनी याला होकार दिलाय. राज्यात सध्या जे दोन आघाडीचे पक्ष आहे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहे, त्यामुळे आपण आम आदमीत प्रवेश करत आहोत असं पांढरे यांनी स्पष्ट केलं. पांढरे यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना लिहिलेल्या पत्रामुळे 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा उघडकीला आला होता. यामुळे अजित पवारांना पायउतार व्हावे लागले होते. आता विजय पांढरे आम आदमी पक्षाच्या वतीने ते निवडणूक लढवणार आहेत. उद्या अधिकृतपणे ते आम आदमी पार्टीत प्रवेश करणार आहेत.

    जाहिरात
    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात