28 डिसेंबर : कुस्तीतील मानाचा समजला जाणारा महाराष्ट्र केसरी हा किताब जळगावच्या विजय चौधरीने पटकावला आहे. रविवारी पुण्याच्या सचिन येलबरसोबत झालेल्या अंतिम सामन्यात विजयने बाजी मारत महाराष्ट्र केसरीवर नाव कोरले आहे. महाराष्ट्र केसरी किताब पटकावणारा विजय हा 41 वा कुस्तीपटू ठरला आहे.
महाराष्ट्र केसरी ही राज्यात मानाची सर्वोत्तम कुस्ती स्पर्धा म्हणून ओळखली जाते. यंदा ही स्पर्धा अहमदनगरमधील वाडिया पार्क क्रीडा संकुलात रंगली होती. लाल मातीत रंगणारी ही कुस्ती स्पर्धा कुस्तीप्रेमींसाठी पर्वणीच असते. यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत यापूर्वी महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावणार्या एकाही खेळाडूने सहभाग घेतला नव्हता. त्यामुळे यंदा महाराष्ट्र केसरी हा किताब नवीन खेळाडू पटकावण्याची संधी मिळाली. रविवारी संध्याकाळी जळगावच्या विजय चौधरी आणि पुण्याच्या सचिन येलबर यांच्यात अंतिम सामना पार पडला. यामध्ये विजयने सचिन येलबरला धूळ चारत महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++