जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / 'वंदे मातरम्' हेच राष्ट्रगीत मानलं पाहिजे- भैय्याजी जोशी

'वंदे मातरम्' हेच राष्ट्रगीत मानलं पाहिजे- भैय्याजी जोशी

'वंदे मातरम्' हेच राष्ट्रगीत मानलं पाहिजे- भैय्याजी जोशी

02 मार्च : जन गण मनमध्ये राज्यांचा गौरव केला आहे. त्यामुळे आपण त्याचा आदर केलाच पाहिजे. पण वंदे मातरम् हेच राष्ट्रगीत मानलं पाहिजे असं वादग्रस्त व्यक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाहक भैय्याजी जोशी यांनी केलंय. ‘भारत माता की जय म्हणण्यास लोकांना आज सांगावं लागतं असं मत काही दिवसांपूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं होतं. त्याच्या विधानानंतर देशभरात वेगवेगळे पडसाद उमटले. आता ‘वंदे मातरम्’ राष्ट्रगीत व्हावं अशी नवी मागणी संघातून होत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    bhaiyyaji_joshi 02 मार्च : जन गण मनमध्ये राज्यांचा गौरव केला आहे. त्यामुळे आपण त्याचा आदर केलाच पाहिजे. पण वंदे मातरम् हेच राष्ट्रगीत मानलं पाहिजे असं वादग्रस्त व्यक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाहक भैय्याजी जोशी यांनी केलंय.

    ‘भारत माता की जय म्हणण्यास लोकांना आज सांगावं लागतं असं मत काही दिवसांपूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं होतं. त्याच्या विधानानंतर देशभरात वेगवेगळे पडसाद उमटले. आता ‘वंदे मातरम्’ राष्ट्रगीत व्हावं अशी नवी मागणी संघातून होत आहे.

    जाहिरात

    संघाचे सहकार्यवाहक भैय्याजी जोशी यांनी ‘जन गण मन’ला एका प्रकारे विरोध दर्शवलाय. ‘जन गण मन’मध्ये राज्यांचा गौरव करण्यात आलाय. राज्य घटनेनुसार जन गण मन हेच राष्ट्रगीत आहे. पण, वंदे मातरम् हेच राष्ट्रगीत मानलं पाहिजे असं मत जोशी यांनी व्यक्त केलं.

    तसंच ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्र या भावनेबद्दल आदर व्यक्त करते असंही भैय्याजी जोशी म्हणाले. तर ज्यांनी भारताकडे फक्त भोगवादी दृष्टीनं पाहिलं त्यांनाच भारत माता की जय म्हणायची लाज वाटेल असं म्हणत त्यांनी ओवेसींवर अप्रत्यक्ष टीकाही केली. भैय्याजी जोशी यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची चिन्ह आहे.


    बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv


    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात