जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / गणेश मंडळांसाठी पालिकेचं आयुक्तांना साकडं

गणेश मंडळांसाठी पालिकेचं आयुक्तांना साकडं

गणेश मंडळांसाठी पालिकेचं आयुक्तांना साकडं

26 सप्टेंबर : मुंबईत अगोदरच खड्‌ड्यांची कमी नाही त्यातच गणेशोत्सवाच्या काळात मंडळांकडून खड्‌ड्यात आणखी खड्डे खोदण्यात आले. या प्रकरणी लालबागच्या राजाला मुंबई पालिकेनं 23 लाखांचा दंड मागिल वर्षी ठोठावला होता. पण लालबाग गणेश मंडळाने तो भरलाच नाही. त्यामुळे आता मुंबई महापालिकेनं लालबागच्या राजासह इतर मंडळांना दंड माफ करण्यासंदर्भात विनंती करणार पत्र पालिका आयुक्तांना पाठवलंय. तसा प्रस्तावही तयार करण्यात आलाय. ज्या प्रमाणे मॅरेथॉनच्या वेळी झालेले खड्डे माफ करण्याची विशेष सवलत महापालिकेनं दिली.

  • -MIN READ
  • Last Updated :

    Image img_189872_mumbaimnp_240x180_300x255.jpg 26 सप्टेंबर : मुंबईत अगोदरच खड्‌ड्यांची कमी नाही त्यातच गणेशोत्सवाच्या काळात मंडळांकडून खड्‌ड्यात आणखी खड्डे खोदण्यात आले. या प्रकरणी लालबागच्या राजाला मुंबई पालिकेनं 23 लाखांचा दंड मागिल वर्षी ठोठावला होता. पण लालबाग गणेश मंडळाने तो भरलाच नाही. त्यामुळे आता मुंबई महापालिकेनं लालबागच्या राजासह इतर मंडळांना दंड माफ करण्यासंदर्भात विनंती करणार पत्र पालिका आयुक्तांना पाठवलंय. तसा प्रस्तावही तयार करण्यात आलाय. ज्या प्रमाणे मॅरेथॉनच्या वेळी झालेले खड्डे माफ करण्याची विशेष सवलत महापालिकेनं दिली. तशीचं विशेष सवलत या मंडळाना द्यावी अशी सुचना स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी कमिशनरांना केलीये. 2012 साली गणेशोत्सवाच्या काळात झालेले खड्डे मंडळानं न भरल्यामुळे लालबागच्या राजाला 23 लाखांचा दंड ठोठावला होता. या दंडाची रक्कम मंडळानं यावर्षीही भरली नव्हती. त्यानंतर आता महापालिकेतील सत्ताधारी हे लालबागसह इतर मंडळाच्या मदतीला धावून आल्याचं पहायला मिळतंय.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: raja
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात