जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / रोहित वेमुलाची आई आणि भावाचा बौद्ध धम्मात प्रवेश

रोहित वेमुलाची आई आणि भावाचा बौद्ध धम्मात प्रवेश

रोहित वेमुलाची आई आणि भावाचा बौद्ध धम्मात प्रवेश

14 एप्रिल : हैदराबाद विद्यापीठात आत्महत्या केलेला विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आई आणि भावानी मुंबईत आज (गुरूवारी) बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत दादर इथल्या आंबेडकर भवनात धम्म दीक्षा सोहळ्यात त्यांनी दीक्षा घेतली. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न स्व. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 125 वी जयंती आहे. या घटनेचे औचित्य साधून रोहित वेमुलाची आई राधिका आणि भाऊ राजा यांनी हिंदू धर्माचा त्याग करत बौद्ध धर्मात प्रवेश केला. रोहित वेमुला हा हैदराबाद विद्यापीठात पीएचडी करणारा विद्यार्थी होता.

  • -MIN READ
  • Last Updated :
    ߸üÝÖÖêêy

    14 एप्रिल :  हैदराबाद विद्यापीठात आत्महत्या केलेला विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आई आणि भावानी मुंबईत आज (गुरूवारी) बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत दादर इथल्या आंबेडकर भवनात धम्म दीक्षा सोहळ्यात त्यांनी दीक्षा घेतली.

    भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न स्व. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 125 वी जयंती आहे. या घटनेचे औचित्य साधून रोहित वेमुलाची आई राधिका आणि भाऊ राजा यांनी हिंदू धर्माचा त्याग करत बौद्ध धर्मात प्रवेश केला. रोहित वेमुला हा हैदराबाद विद्यापीठात पीएचडी करणारा विद्यार्थी होता. 17 जानेवारी रोजी त्यानं प्रशासनाकडून झालेल्या अन्यायामुळे आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येनंतर देशातलं राजकीय आणि सामाजिक जीवन ढवळून निघालं होतं. त्यानंतर देशभरात दलित आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. याचे पडसाद जेएनयू, पुणे आणि मुंबई विद्यापीठामध्येही पडले होते.


    बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv


    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात