15 ऑगस्ट : 68 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस शौर्य पदकांची घोषणा करण्यात आली. यात गडचिरोली जिल्ह्यानं बाजी मारली आहे. अत्यंत कौतुकास्पद आणि उल्लेखनीय कामगिरी करणार्या गडचिरोली जिल्ह्याच्या पोलीस दलातील शूरवीर जवानांनी अतिदुर्गम भागात नक्षलवाद्यांशी दोन हात करून त्यांना कंठस्नान घातले. गडचिरोलीवासीयांना नक्षलवाद्यांच्या दहशतीतून मुक्त ठेवण्याचे काम करणार्या 3 जाणांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक जाहीर करण्यात आलं आहे. 20 पोलिसांना शौर्य पदक जाहीर झालं आहे. त्याशिवाय तिघांना विशेष सेवा बजावल्याबद्दल राष्ट्रपतींचं पदक जाहीर करण्यात आलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिन्ही राष्ट्रपती पोलीस शौर्य पदकासह एकूण 23 पदकं एकट्या गडचिरोली जिल्ह्याच्या वाट्याला आली आहेत.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++