30 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीत सपाटून पराभवामुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अजूनही दुखातून सावरले नाही. उद्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत. या शपथविधीला देशभरातून मान्यवर हजर राहणार आहेत. पण राज ठाकरे यांनी शपथविधीला न जाण्याचा निर्णय घेतलाय. आपल्या राहत्या घरीच टीव्हीवर शपथविधीचा सोहळा पाहणार असल्याचं राज यांनी स्पष्ट केलंय.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रेम सर्वश्रूत आहे. लोकसभेत राज यांनी थेट मोदींना पाठिंबा दिला होता पण दुर्देवाने सर्वच उमेदवार पराभूत झाले. विधानसभेच्या आखाड्यात मात्र चित्र उलट पाहण्यास मिळालं. राज यांनी थेट पंतप्रधानांवरच निशाणा साधला आणि भाजपवर सडकून टीका केली होती. आता भाजपने सर्वाधिक जागा जिंकून सत्ता स्थापनेसाठी दावा केलाय. उद्या 31 तारखेला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे तर त्यांच्या छोटेखानी मंत्रिमंडळही शपथ घेणार आहे. या शपथविधीसाठी भाजपने सर्वच स्तरातील मान्यवरांना आमंत्रित केलंय. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही निमंत्रण पाठवण्यात आलंय.पण राज ठाकरे शपथविधीला जाणार नाहीयेत. आपण फोनवरूनच देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या असल्याचं राज यांनी सांगितलं. मात्र, हा सोहळा आपण घरीच टीव्हीवर शपथविधी पाहणार असल्याचं राज यांनी स्पष्ट केलंय. राज ठाकरे नगर जिल्ह्यातील पाथर्डी इथं जवखेडेला भेट देणार आहे त्यामुळे उद्याचा शपथविधीला जाणार नाही असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++