जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / राज्यात भाजपमध्ये नेमके अधिकार कुणाला ?उद्धव ठाकरेंचा सवाल

राज्यात भाजपमध्ये नेमके अधिकार कुणाला ?उद्धव ठाकरेंचा सवाल

राज्यात भाजपमध्ये नेमके अधिकार कुणाला ?उद्धव ठाकरेंचा सवाल

11 मार्च : हिंदूत्वाच्या मुद्यावर शिवसेना आणि भाजप एकत्र आलीय. पण अलीकडेच झालेल्या प्रकारांमुळे राज्यात चर्चा करण्याचे आणि निर्णय घ्यायचे अधिकार कुणाला आहेत? केवळ सरकार बनवण्यासाठी एकत्र निवडणूक लढवतोय का? जर भाजपला मनसेचा पाठिंबा चालत असेल तर मग निवडणुकीत एकमेकांविरोधात लढायचं आणि सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा घ्यायची ही नीती असेल तर आपल्यामध्ये आणि अरविंद केजरीवालमध्ये फरक काय ? असा थेट सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला विचारलाय. याबाबत राजीव प्रताप रूडींशी फोनवर चर्चा झाली आहे तसंच देवेंद्र फडणवीस यांची भेटही झाली असून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांच्याशीही चर्चा झाली पण भाजपने सेनेच्या प्रश्नाची उत्तर द्यावी अशी मागणी आता उद्धव यांनी केलीय.

  • -MIN READ
  • Last Updated :

    udhav thakare on modi 11 मार्च : हिंदूत्वाच्या मुद्यावर शिवसेना आणि भाजप एकत्र आलीय. पण अलीकडेच झालेल्या प्रकारांमुळे राज्यात चर्चा करण्याचे आणि निर्णय घ्यायचे अधिकार कुणाला आहेत? केवळ सरकार बनवण्यासाठी एकत्र निवडणूक लढवतोय का? जर भाजपला मनसेचा पाठिंबा चालत असेल तर मग निवडणुकीत एकमेकांविरोधात लढायचं आणि सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा घ्यायची ही नीती असेल तर आपल्यामध्ये आणि अरविंद केजरीवालमध्ये फरक काय ? असा थेट सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला विचारलाय. याबाबत राजीव प्रताप रूडींशी फोनवर चर्चा झाली आहे तसंच देवेंद्र फडणवीस यांची भेटही झाली असून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांच्याशीही चर्चा झाली पण भाजपने सेनेच्या प्रश्नाची उत्तर द्यावी अशी मागणी आता उद्धव यांनी केलीय.

    जाहिरात

    मनसेचं ‘गिरा तो भी टांग उपर’ तसंच उद्धव यांनी राज ठाकरे यांचं नाव न घेता टीका केली. आता कुणीही उठतंय आम्ही लोकसभा लढवू असं सांगतंय. निवडणूक आलो तर मोदींना पाठिंबा देऊ म्हणजे निवडणूक लढवायची, विरोधालाही उभं राहायचं आणि ‘गिरा तो भी टांग उपर’असंच आहे. याचा अर्थ असा आहे मनसे राजकारणातून संपली आहे. केवळ मतं मागण्यासाठी नरेंद्र मोदींचा मुखवटा घालून मतं मागायची आणि लोकांमध्ये संमभ्र निर्माण करायचा अशी टीका उद्धव यांनी मनसेवर केली. गडकरींचं ‘मान ना मान में तेरा मेहमान’ भाजप संकटात असताना सेना त्यांच्यासोबत राहिली. भाजप आणि सेनेची युती गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. पण सगळं चांगलं सुरू असताना ‘मान ना मान में तेरा मेहमान’ असं म्हणून काही जण चिकटताय. एखादी व्यक्ती म्हणजे भाजपची रणनीती नाही असा टोलाही उद्धव यांनी गडकरींना लगावलाय. भाजप नेत्यांची धावपळ भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आणि महायुतीत वादळ आलंय. शिवसेनेत तर कमालीची अस्वस्थता निर्माण झालीये. सेनेनं या अगोदर दोनदा सामनाच्या अग्रलेखातून गडकरी, भाजपवर टीका केली. पण यानंतरही भाजप नेत्यांची ‘कृष्णकुंज’वर वारी सुरूच होती. अखेर आज (मंगळवारी) उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकार्‍यांची यांची शिवसेना भवनामध्ये महत्त्वाची बैठक बोलावली होती. बैठकीनंतर निर्णय जाहीर करू असे संकेत उद्धव यांनी दिले होते. त्यामुळे भाजपच्या नेत्यांची एकच धावपळ सुरू झालीय. महाराष्ट्र भाजपचे प्रभारी राजीव प्रताप रूडी उद्धव यांची भेट घेण्यासाठी मुंबईत येणार आहेत. ते उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मोदींच्या पाठिंब्यासाठी डर्बी रेस सुरू, ‘सामना’तून टीका दरम्यान, शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून मनसेचं नाव न घेता टीका करण्यात आलीय. सेना-भाजप युती भक्कम असल्याचं या लेखात नमुद करण्यात आलंय. मोदींना देशभरातून पाठिंबा मिळतोय, एकप्रकारे पाठिंब्याची डर्बी रेसच चाललीय. कालपर्यंत मोदींना लाखोल्या वाहणारे आरंभशूर पुढारी आज मोदींना न मागता पाठिंबा देतायत सेना-भाजपचे नाते राज्यातल्या राजकारणातले सर्वात जुने नाते इतरांना विचार करण्याची गरज नाही युती तुटावी यासाठी अनेकांनी कट-कारस्थान केली, घरभेदीपणाही झाला पण सगळ्यांना युती पुरून उरली.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात