जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / 'राज'पुत्र उतरणार महापालिका निवडणुकीच्या प्रचारात

'राज'पुत्र उतरणार महापालिका निवडणुकीच्या प्रचारात

'राज'पुत्र उतरणार महापालिका निवडणुकीच्या प्रचारात

06 फेब्रुवारी : मनसेच्या जवळपास बंद पडलेल्या इंजिनला चालना देण्सासाठी खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आता मैदानात उतरणार आहेत. अमित ठाकरे उद्या पहिल्यांदाच मनसेच्या फेसबूक पेजवरून आपल्या मतदारांशी संवाद साधणार आहे. अमितने आधी विधानसभा निवडणुकीत रोड शोद्वारे मनसेचा प्रचार केला होता. मात्र, आता तो फेसबूक चॅटद्वारे नेटिझन्स समोर पक्षाची बाजू मांडणार आहेत. जाहिरात 25 वर्षीय अमितला आतापर्यंत वडील राज ठाकरे यांच्या सभेत कार्यकर्त्यांमध्ये बसलेलं आपण पाहिलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :
    Amit thackray

    06 फेब्रुवारी :  मनसेच्या जवळपास बंद पडलेल्या इंजिनला चालना देण्सासाठी खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आता मैदानात उतरणार आहेत.

    अमित ठाकरे उद्या पहिल्यांदाच मनसेच्या फेसबूक पेजवरून आपल्या मतदारांशी संवाद साधणार आहे. अमितने आधी विधानसभा निवडणुकीत रोड शोद्वारे मनसेचा प्रचार केला होता. मात्र, आता तो फेसबूक चॅटद्वारे नेटिझन्स समोर पक्षाची बाजू  मांडणार आहेत.

    जाहिरात

    25 वर्षीय अमितला आतापर्यंत वडील राज ठाकरे यांच्या सभेत कार्यकर्त्यांमध्ये बसलेलं आपण पाहिलं आहे. मात्र, आता तो सक्रिय राजकारणात उतरताना दिसतायेत. विशेष म्हणजे मनसेच्या टीमनं त्यांचा जो प्रोमो रिलिज केलाय त्यात त्यांनी अमितला तरूण ह्दयसम्राट असं म्हणून नामकरण करून टाकलय.

    दरम्यान, शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी 4 वर्षांपूर्वी युवा सेनेच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात भाग घेतला. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी अतिशय समर्थपणे राज्य भरात युवा सेनेच्या माध्यमाने तरुणांचं जाळं विणलं. आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही जनाधार मिळवण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे.

    त्यामुळे राज ठाकरे यांचे चिरंजीव कधी राजकारणात येणार? असे प्रश्न राज ठाकरे यांना विचारले जात होते. या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे यांनी नेहमी अजून त्याला वेळ आहे, म्हणून हा प्रश्न टाळला होता. मात्र, आता आपल्या चिरंजीवालाही राजकारणात उतरविण्याची वेळ आल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे  मुंबईत आता सत्तेची लढाई दोन छोट्या ठाकरेंमध्येही दिसणार आहे.

    अमित राज ठाकरे

     - वय-२५ वर्ष - जन्म तारीख- २४ मे १९९२ - शिक्षण- एमबीए करतोय( मार्केटिंग) - बी कॉमची पदवी - खेळाची आवड ( फुटबॉल, किक बॉक्सिंग, सायकलिंग) - कला - स्केचिंग करतो - सध्या राज ठाकरेंच्या प्रेस कॉन्फरन्स, भाषण, कार्यक्रमांना उपस्थित राहातो.


    बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv

    जाहिरात

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात