09 जानेवारी : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी आज अधिकृतरित्या पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. डिसेंबर 2012 मध्ये ते भाजप मधून बाहेर पडले होेते. येडियुरप्पांनी स्थापन केलेला पक्षही आता भाजपमध्ये विलिन होणार आहे. लोेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घटना महत्वाची मानली जाते आहे. या आधी येडियुरप्पांनी नरेंद्र मोदींना पाठिंबा दर्शवला होता. गेल्या वर्षी भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून भाजपने येडिरयुप्पा यांना मुख्यमंत्रीपदावरून काढल्यावर त्यांनी पक्ष सोेडला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Yediyurppa