जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / युग चांडक हत्येप्रकरणी दोन्ही आरोपींची फाशीची शिक्षा कायम

युग चांडक हत्येप्रकरणी दोन्ही आरोपींची फाशीची शिक्षा कायम

युग चांडक हत्येप्रकरणी दोन्ही आरोपींची फाशीची शिक्षा कायम

मुंबई – 05 मे : युग चांडक या 8 वर्षीय चिमुकल्याचं खंडणीसाठी अपहरण आणि निर्घृण खुनाच्या प्रकरणात दोन्ही आरोपींना नागपूरमधील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा मुंबई हाय कोर्टाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी कायम ठेवली. नागपूर इथल्या डेंटिस्ट डॉ. मुकेश चांडक यांचा 8 वर्षांचा मुलगा युगचे 1 सप्टेंबर 2010मध्ये राजेश आणि अरविंद या दोघांनी खंडणीसाठी अपहरण केलं होतं. सुरूवातीला त्यांनी युगच्या वडिलांकडे 5 कोटींची खंडणी मागितली. मात्र, त्यानंतर पकडलं जाण्याच्या भीतीने या दोघांनी युगची निर्घृण हत्या केली.

  • -MIN READ
  • Last Updated :
    nagpur yug

    मुंबई – 05 मे : युग  चांडक या 8 वर्षीय चिमुकल्याचं खंडणीसाठी अपहरण आणि निर्घृण खुनाच्या प्रकरणात दोन्ही आरोपींना नागपूरमधील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा मुंबई हाय कोर्टाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी कायम ठेवली.

    नागपूर इथल्या डेंटिस्ट डॉ. मुकेश चांडक यांचा 8 वर्षांचा मुलगा युगचे 1 सप्टेंबर 2010मध्ये राजेश आणि अरविंद या दोघांनी खंडणीसाठी अपहरण केलं होतं. सुरूवातीला त्यांनी युगच्या वडिलांकडे 5 कोटींची खंडणी मागितली. मात्र, त्यानंतर पकडलं जाण्याच्या भीतीने या दोघांनी युगची निर्घृण हत्या केली. या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली होती.

    जाहिरात

    या प्रकरणी 4 फेब्रुवारी जिल्हा आणि सत्र न्यायालयाने युक्तिवाद ऐकल्यावर दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी आरोपींनी हा गुन्हा केला आहे. त्यामुळे त्यांचे वय जरी कमी असलं तरी त्यांनी अत्यंत शांत डोक्याने कट रचून 8 वर्षांच्या बालकाची निर्घृण हत्या केली. त्यामुळे त्यांचा गुन्हा माफ करण्यासारखा नसल्याचं कोर्टाने आपल्या निकालात नमूद केलं होतं. सत्र न्यायालयाच्या याच निर्णयाच्या विरोधात आरोपींनी हायकोर्टात धाव घेतली होती. त्यावर आज हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने ही शिक्षा कायम ठेवली आहे. हे दुर्मीळ प्रकरण असून आरोपी बाहेर राहणं समाजासाठी योग्य नसल्याचा निर्वाळा यावेळी कोर्टाने दिला.


    बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv


    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात