15 जून : जॉर्जियात आलेल्या पुरानं सध्या राजधानी तिबिलिसीमध्ये हाहाकार माजवला आहे. त्यातच या पुरामुळे राजधानीतल्या प्राणीसंग्रहालयातले सगळे प्राणी शहरभर सुटल्यानं सध्या या भागात 'जुमांजी' चित्रपटासारखंच वातावरण आहे. गाड्याच्या रांगेतून मधूनच पोहत जाणारी मगर तर कुठे एसीला टिकटून बसलेलं अस्वल...असचं चित्र सध्या तिबिलिसीमध्ये पाहण्यास मिळतंय.
शहरभर पळालेल्या जंगली प्राण्यांना पकडण्याचे आणि ते शक्य नसेल तर त्यांना ठार मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पण, त्यातूनही जास्तीत जास्त प्राण्यांना वाचवण्याचे प्रयत्न प्रशासन करत आहे. शहरात पिसाळलेल्या एक हिप्पोला अशाच पद्धतीनं वाचवण्यात आलंय. तर इतरही प्राण्यांना वाचवण्याची पराकाष्ठा सरकारी अधिकारी करत आहेत. प्राणीसंग्रहालयातून पळालेल्या 20 कोल्हे, आठ सिंह, पांढरेवाघ, 17 पेंग्विन, लांडगे, चित्ते अशा प्राण्यांना पकडण्याचे प्रयत्न सध्या शहरभर सुरू आहेत. एकीकडे प्राण्यांची दहशत पसरलीय. तर दुसरीकडे प्राणीसंग्रहालयातून पळालेल्या अनेक प्राणांना सुरक्षा दलाच्या जवानांनी दिवसभरात गोळ्या घालून ठार केलंय.
दरम्यान, जॉर्जिया देशात महापूर आलाय. बिलिसी या देशाच्या राजधानीत 12 जणांचा मृत्यू झालाय, तर 24 जण बेपत्ता आहेत. दोन दिवसांपूर्वी तिबिलिसीमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहत होते. मृतांमध्ये तीन प्राणी संग्रहालय अधिकार्यांचा समावेश आहे. अनेक प्राणी बेपत्ता असण्याचीही शक्यता आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
[if0] | Follow @ibnlokmattv[sc0] |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Zoo