19 जानेवारी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अतिरेक्यांपासून धोका असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. यासीन भटकळ यांच्या सुटकेसाठी अतिरेकी केजरीवाल यांचं अपहरण करण्याची शक्यता असल्याची गुप्तचर विभागाची माहिती आहे. यासंबंधात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं अरविंद केजरीवाल यांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आता दिल्ली पोलीस केजरीवाल यांची सुरक्षा वाढवणार असल्याचंही समजतंय. पण, यापूर्वी केजरीवाल यांनी Z दर्जाची सुरक्षा नाकारली होती.
दिल्लीचे मुख्यमंत्रीपदावर विराजमान होऊनही आम आदमीसारखे राहणारे अरविंद केजरीवाल देशभराचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहेत. दिवसेनदिवस त्यांची लोकप्रियता वाढत आहे. भारतात दहशचवादी हल्ल्यात महत्वाची भूमिका बजवणार्या व डंडियन मुजाहिदीनचा म्हेरक्या यासीन भटकळ सध्या भारताच्या तपास यंत्रणाच्या ताब्यात आहेत. त्याच्या सुटकेसाठी डंडियन मुजाहिदीनने केजरीवाल यांचे अपहरण करण्याचा कट रचल्याती माहिती गुप्तचारांनी दिल्ली पोलिसांना दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aam aadmi party, AAP, Arvind kejriwal, Z security