जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / यासीन भटकळसह 5 दोषींना फाशीची शिक्षा

यासीन भटकळसह 5 दोषींना फाशीची शिक्षा

यासीन भटकळसह 5 दोषींना फाशीची शिक्षा

19 डिसेंबर : हैदराबादमध्ये 2013 च्या बॅाम्बस्फोट प्रकरणी यासीन भटकळसह 5 दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीये. एनआयएच्या विशेष कोर्टाने हा निर्णय दिलाय. हैदराबादमधील दिलसुखनगर 21 फेब्रुवारी 2013 मध्ये स्फोट झाला होता. या स्फोटात 18 लोकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पहिल्यांदाच इंडियन मुजाहिद्दीन संघटनेच्या अतिरेक्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीये. भटकळसह इतर दोषींवर आयपीएस शस्त्र अधिनियम आणि बेकायदा कृत्य अधिनियम (यूएपीए) कलमांतर्गत दोषी ठरवलंय. भटकळ व्यतिरिक्त उत्तर प्रदेशमधील असदुल्ला अख्तर, पाकिस्तानी जिया-उर-रहमान उर्फ वकास, बिहार येथील तहसीन अख्तर आणि महाराष्ट्रातील एजाज शेखला दोषी ठरवण्यात आलंय.

  • -MIN READ
  • Last Updated :

    bhatkal1209 19 डिसेंबर : हैदराबादमध्ये 2013 च्या बॅाम्बस्फोट प्रकरणी यासीन भटकळसह 5 दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीये. एनआयएच्या विशेष कोर्टाने हा निर्णय दिलाय. हैदराबादमधील दिलसुखनगर 21 फेब्रुवारी 2013 मध्ये स्फोट झाला होता. या स्फोटात 18 लोकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पहिल्यांदाच इंडियन मुजाहिद्दीन संघटनेच्या अतिरेक्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीये. भटकळसह इतर दोषींवर आयपीएस शस्त्र अधिनियम आणि बेकायदा कृत्य अधिनियम (यूएपीए) कलमांतर्गत दोषी ठरवलंय. भटकळ व्यतिरिक्त उत्तर प्रदेशमधील असदुल्ला अख्तर, पाकिस्तानी जिया-उर-रहमान उर्फ वकास, बिहार येथील तहसीन अख्तर आणि महाराष्ट्रातील एजाज शेखला दोषी ठरवण्यात आलंय. या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार रियाज भटकळ मात्र अजूनही फरार आहे. रियाज  हा कराचीमध्ये लपून बसलाय. दिलसुखनगर बॅाम्बस्फोट प्रकरणी 157 साक्षीदारांना कोर्टात हजर करण्यात आलंय. मागील वर्षी 24 अॅागस्टला या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली. तपास पथकाने चोख काम केलं असून इंडियन मुजाहिद्दीनच्या सदस्यांना पहिल्यांदाच दोषी सिद्द करण्यात आलंय अशी माहिती एनआयएचे महानिर्देशक शरद कुमार यांनी दिली. एनआयएने आपल्या आरोपपत्रात इंडियन मुजाहिद्दीनने भारताच्या विरोधात युद्ध पुकारण्याचा कट रचणे आणि लोकांमध्ये आपल्या संघटनेबद्दल दहशत निर्माण करण्यासाठी हैदराबादमध्ये स्फोट  घडवून आणला होता.


    बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv


    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात