जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / 'मोदी नव्हे,अडवाणीच सर्वोच्च नेते'

'मोदी नव्हे,अडवाणीच सर्वोच्च नेते'

'मोदी नव्हे,अडवाणीच सर्वोच्च नेते'

23 जुलै : गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविरोधात भाजपमधूनच आणखी एक नाराजीचा सूर उमटू लागलाय. ‘गुजरातमधल्या प्रचंड विजयानंतर मोदी भलेही लोकप्रिय नेते बनले असतील पण भाजपमध्ये अडवाणीच सर्वोच्च नेते आहेत’ असं वक्तव्य अभिनेते आणि भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हांनी आज केलंय. अडवाणी केवळ भाजपचेच नाहीत तर देशातले सर्वोच्च नेते आहेत आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. अडवाणींनी भाजप पक्षाला उभं केलंय. त्यांच्यात व्हिजन आहे, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची त्यांच्यात क्षमता आहे असंही ते म्हणाले.

  • -MIN READ
  • Last Updated :

    shatrughan sinha 23 जुलै : गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविरोधात भाजपमधूनच आणखी एक नाराजीचा सूर उमटू लागलाय. ‘गुजरातमधल्या प्रचंड विजयानंतर मोदी भलेही लोकप्रिय नेते बनले असतील पण भाजपमध्ये अडवाणीच सर्वोच्च नेते आहेत’ असं वक्तव्य अभिनेते आणि भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हांनी आज केलंय.

    अडवाणी केवळ भाजपचेच नाहीत तर देशातले सर्वोच्च नेते आहेत आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. अडवाणींनी भाजप पक्षाला उभं केलंय. त्यांच्यात व्हिजन आहे, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची त्यांच्यात क्षमता आहे असंही ते म्हणाले. निवडणुकीसाठी पक्षात म्हणजेच भाजपमध्ये स्थापन झालेल्या अनेक समित्यांवरही त्यांनी टीका केलीय.

    जाहिरात

    माझ्या सोबत काय झालं याचं मला दुख नाही. पण ज्या प्रकार पक्षामध्ये वरिष्ठ नेत्यांना वागणूक दिली जात आहे ते चुकीचे आहे. जे ध्येय साधण्यासाठी पक्षाने मोदींचं गुणगाण गाण्यास सुरूवात केलीय असं होऊ नये की, जे मिळवायचं आहे ते आणखी दूर जाईल असा सल्लाही सिन्हा यांनी दिला.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात