मुंबई (19 फेब्रुवारी) : वरळीतल्या कॅम्पा कोला प्रकरणानं मुंबईकरांच्या डोळ्यात अंजन घातलंय. वर्षांनुवर्ष ज्या इमारतीमध्ये वास्तव्य असलं, तरी नियमांचं उल्लंघन झाल्याचं समोर आलं तर त्याचा फटका रहिवाशांनाच बसू शकतो हे या प्रकरणानं दाखवून दिलंय. त्यामुळे आपलीही स्थिती कॅम्पाकोलातल्या रहिवाशांप्रमाणे होऊ नये अशी भीती वाटणार्या भायखळ्यातल्या रहिवाशांनी तसा बॅनरचं इमारतीवर लावून आपली व्यथा मांडलीये. बिल्डरनं केलेल्या या अवैध बांधकामाचा भांडाफोड झालाय.
हुसैनी टॉवरच्या इमारतीवर लिहिलंय ‘पुन्हा एक कॅम्पा कोला’. हुसैनी टॉवरच्या बिल्डरने अवैध बांधकाम केल्याचं समोर आलंय. त्यामुळे महापालिकेनं त्यांना 1 कोटी 8 लाख रुपये इतका प्रॉपर्टी टॅक्स बजावलाय. यासंदर्भात वारंवार तक्रार करुनही पालिकेने बिल्डरवर कोणतीच कारवाई केलेली नाही. पण, बिल्डरवर काही कारवाई करण्याचं सोडून, रहिवाशांना घरांचा लिलाव केला जाईल अशी नोटीस बजावलीय. त्यामुळे वैतागलेल्या रहिवाशांनी अखेर ‘पुन्हा एक कॅम्पा कोला’ बॅनर लावण्याचा पर्याय स्विकारलाय. नेमकं काय आहे हे प्रकरण ? - हुसैनी टॉवरमध्ये एकूण 81 कुटुंबं - पुनर्विकास झालेली इमारत - 39 कुटुंबं मूळच्या इमारतीतले रहिवासी - 2010साली मिळाला नव्या इमारतीचा ताबा - परवानगीशिवाय अतिरिक्त बांधकाम - इमारत बांधकामासाठी मिळालेली परवानगी - 2605 स्क्वेअर मीटर - झालेलं बांधकाम- 4333 स्क्वेअर मीटर - रहिवाशांना लावला दुप्पट प्रॉपर्टी टॅक्स -1 कोटी 8 लाखांचा प्रॉपर्टी टॅक्स ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++