23 ऑक्टोबर: सर्वांचा विरोध पत्करून मोठ्या अट्टाहास करून पालिकेने मुंबईत आणलेल्या 8 पेंगविनपैकी एका पेंगविनचा जीवाणू संसर्गामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. आज (रविवारी) सकाळी 8.17 च्या सुमारास पेंग्विनचा मृत्यू झाला.
दक्षिण कोरियाच्या सेऊलमधील कोएक्स अॅक्वेरिअममधून मुंबईतील जिजामाता उद्यानात एकूण आठ पेंग्विन आणण्यात आले होते. यापैकी एका पेंग्विनचा बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे मृत्यू समोर आलं आहे.
मुंबईतील राणीच्या बागेत ठेवण्यासाठी पालिकेने 26 जुलैला दक्षिण कोरियातून 3 नर आणि 5 मादी असे 8 पेंगविन आणले होते. राणीच्या बागेतील क्वारेंटाईनमध्ये सर्व पेंग्विनना ठेवण्यात आलं होतं. दक्षिण कोरियासारखं तापमानही राणीच्या बागेत तयार करण्यात आलं आहे. वॉटर क्वॉलिटीही पेंग्विनला अनुकूल ठेवण्यात येत आहे.
दरम्यान, शितप्रदेशीय पक्ष्याला मुंबईत आणण्याला पक्षी-प्राणी प्रेमींकडून, तसंच राजकीय वर्तूळातून विरोध झाला होता. केवळ ठाकरे कुटुंबातील नव्या पिढीची हौस भागवण्यासाठी या पक्षाला आणल्याचा आरोपही करण्यात आला होता. त्यानंतरही पालिकेने 20 कोटी रुपये खर्चून हे पेंगविन आणले होते. अखेर त्यातील एका पेंगवीनचा मृत्यू झालायं.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv