जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांचा राजीनामा

मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांचा राजीनामा

मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांचा राजीनामा

31 जानेवारी : मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी गुरुवारी संध्याकाळी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला. भारतीय पोलीस सेवेचा राजीनामा देऊन सत्यपाल सिंह राजकारणात प्रवेश करणार आहेत. 1980च्या आयपीएस बॅचचे अधिकारी असलेले सत्यपाल सिंह मुंबई पोलीस आयुक्त असताना राजीनामा देणारे पहिलेच अधिकारी ठरले आहेत. ते पुढच्या वर्षी म्हणजेच 2015 मध्ये निवृत्त होणार होते. पण त्यांनी एक वर्ष आधीच आपल्या पदाचा राजीनामा देवून ते राजकारणात आपली नवी इनिंग सुरू करू पाहत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

    Image img_75702_satyapal1_240x180.jpg 31 जानेवारी : मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी गुरुवारी संध्याकाळी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला. भारतीय पोलीस सेवेचा राजीनामा देऊन सत्यपाल सिंह राजकारणात प्रवेश करणार आहेत. 1980च्या आयपीएस बॅचचे अधिकारी असलेले सत्यपाल सिंह मुंबई पोलीस आयुक्त असताना राजीनामा देणारे पहिलेच अधिकारी ठरले आहेत. ते पुढच्या वर्षी म्हणजेच 2015 मध्ये निवृत्त होणार होते. पण त्यांनी एक वर्ष आधीच आपल्या पदाचा राजीनामा देवून ते राजकारणात आपली नवी इनिंग सुरू करू पाहत आहेत. सत्यपाल सिंग भाजप किंवा आपकडून उत्तर प्रदेश किंवा मुंबईतून आगामी लोकसभेची निवडणूक लढवू शकतात. दरम्यान, सत्यपाल सिंह आपल्या पक्षात आले तर त्यांचे स्वागत आहे, असं दोन्ही पक्षांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे सत्यपाल सिंग आता कोणाची ऑफर स्विकारतात याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. काही वेळापूर्वीच ते पत्रकारांशी बोलताना आता आपल्याला समाजसेवेसाठी वेळ द्यायचा आहे असं सिंह म्हणाले. कोण आहेत सत्यपाल सिंह?

    • 1980च्या महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी
    • जन्म : 29 नोव्हेंबर 1955 उत्तर प्रदेशातील मीरतच्या बसौलीत
    • रसायनशास्त्रात एम.फिल
    • आयपीएस होण्याआधी शास्त्रज्ञ व्हायची इच्छा होती
    • ऑस्ट्रेलियातून MBA
    • पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये एम.ए. आणि पीएच.डी.

    सत्यपाल सिंह यांनी भूषवलेली पदे :

    • पहिलं पोस्टिंग : नाशिकमध्ये सहाय्यक पोलीस अधीक्षक
    • बुलडाणामध्ये पोलीस अधीक्षकपदी बदली
    • अतिरिक्त पोलीस महासंचालक, महाराष्ट्र
    • मुंबईचे पोलीस सहआयुक्त (गुन्हे)
    • नागपूरचे पोलीस आयुक्त
    • कोकणपट्ट्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक
    • सीबीआयमध्ये विशेष नेमणूक
    • आंध्र आणि मध्य प्रदेशातल्या नक्षली भागांमध्ये विशेष कार्यासाठी विशेष पदक
    • 2004 : उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक
    • 1996 : विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पदक

     

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात