जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / मी दहशतवादी नाही, मी आता फ्री मॅन -संजय दत्त

मी दहशतवादी नाही, मी आता फ्री मॅन -संजय दत्त

मी दहशतवादी नाही, मी आता फ्री मॅन -संजय दत्त

मुबंई-25 फेब्रुवारी : आता मला दहशतवादी म्हणू नका मी एक फ्री मॅन आहे. माझावर जो गुन्हा होता त्याची मी शिक्षा भोगुन हा ठसा पुसून टाकला आहे असं आवाहन अभिनेते संजय दत्तने केलंय. तसंच आज मला माझ्या वडिलांची खूप आठवण येत आहे ते आज असते तर त्यांना खूप आनंद झाला असता अशी भावनाही त्याने व्यक्त केली. जाहिरात 1993 बॉम्बस्फोट प्रकरणी शिक्षा भोगून संजय दत्त आज जेलबाहेर आला. पुण्यातून थेट चार्टरप्लेनने संजय दत्तने मुंबई गाठली.

  • -MIN READ
  • Last Updated :

    sanjay_dut33 मुबंई-25 फेब्रुवारी : आता मला दहशतवादी म्हणू नका मी एक फ्री मॅन आहे. माझावर जो गुन्हा होता त्याची मी शिक्षा भोगुन हा ठसा पुसून टाकला आहे असं आवाहन अभिनेते संजय दत्तने केलंय. तसंच आज मला माझ्या वडिलांची खूप आठवण येत आहे ते आज असते तर त्यांना खूप आनंद झाला असता अशी भावनाही त्याने व्यक्त केली.

    जाहिरात

    1993 बॉम्बस्फोट प्रकरणी शिक्षा भोगून संजय दत्त आज जेलबाहेर आला. पुण्यातून थेट चार्टरप्लेनने संजय दत्तने मुंबई गाठली. मुंबई आल्यानंतर त्याने सिद्धीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर तो घरी गेला. आपल्या घरी पत्रकार परिषद घेऊन संजय दत्तने चाहत्यांचे आभार मानले. ‘आजादी इतनी, आसान नही है ’ अशी प्रतिक्रियाच त्याने दिली. आज माझे वडिल जिवंत असते तर त्यांना खूप आनंद झाला असता. माझी आई मी लहान असताना सोडून गेली. मला आईला सांगायचं मी शिक्षा पूर्ण केली आहे आणि आता मी सुटलो आहे. मी तिच्या समाधी च्या ठिकाणी जाऊन तीला नमस्कार केला अशी भावना यावेळी संजय दत्तने व्यक्त केली.

    जेलमध्ये मला सामान्य कैद्याची वागणूक देण्यात आली असून मी रोज कापडी पिशव्या बनवायचो. या कामाले मला 440 रुपये मिळाले ते मी मी माझा पत्नी मान्यताच्या हातात ठेवले असंही त्याने सांगितलं. तसंच 1993 बॉम्बस्फोट प्रकरणी माझावर दहशतवाद्याचा ठपका ठेवण्यात आला. कोर्टाने मला याबाबत शिक्षा दिली ती आता मी भोगली आहे. आता मला दहशतवादी म्हणू नका असं आवाहन संजयने मीडियाला केलं. यावेळी संजय दत्तने सलमान हा माझा लहान भाऊ आहे त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो अशी सहानुभूतीही त्याने व्यक्त केली.

    जाहिरात

    बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv


    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात