जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / महायुतीचा महाराष्ट्र टोलमुक्तीचा नारा, 'वचननामा' प्रसिद्ध

महायुतीचा महाराष्ट्र टोलमुक्तीचा नारा, 'वचननामा' प्रसिद्ध

महायुतीचा महाराष्ट्र टोलमुक्तीचा नारा, 'वचननामा' प्रसिद्ध

14 एप्रिल : ‘समर्थ हिंदूस्थान, समृद्ध महाराष्ट्र’ असं म्हणत महायुतीने आपला जाहीरनामा अर्थात वचननामा जाहीर केलाय. या जाहीरनाम्यात एनडीएचं सरकारच्या विकासकामाचा पाढा वाचत महागाई, शेतकरी, व्यापारी, रेल्वे स्थानक, रस्ते, जकात कर, समाज आणि मुंबईसाठी भरभरून आश्वासन देण्यात आली. पण मराठा आरक्षणाच्या मुद्याला बगल देण्यात आलीय. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसलीय. महायुतीत शामील झालेल्या शिवसंग्राम संघटनेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू असं आश्वासन देण्यात आलंय.

  • -MIN READ
  • Last Updated :

    14april_mahayuti_vactchannama 14 एप्रिल : ‘समर्थ हिंदूस्थान, समृद्ध महाराष्ट्र’ असं म्हणत महायुतीने आपला जाहीरनामा अर्थात वचननामा जाहीर केलाय. या जाहीरनाम्यात एनडीएचं सरकारच्या विकासकामाचा पाढा वाचत महागाई, शेतकरी, व्यापारी, रेल्वे स्थानक, रस्ते, जकात कर, समाज आणि मुंबईसाठी भरभरून आश्वासन देण्यात आली. पण मराठा आरक्षणाच्या मुद्याला बगल देण्यात आलीय.

    मराठा आरक्षणाच्या मुद्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसलीय. महायुतीत शामील झालेल्या शिवसंग्राम संघटनेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू असं आश्वासन देण्यात आलंय. पण मराठा आरक्षणासाठी काय करणार हे नमूदच करण्यात आलं नाही.

    जाहिरात

    तसंच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक इंदू मिलच्या जागेवरच उभारणार असं आश्वासनही देण्यात आलंय. तर महायुती उदयास आल्यानंतर ‘टोलमुक्त महाराष्ट्राचा’ नारा वचननाम्यातही कायम ठेवण्यात आलाय. महाराष्ट्र टोलमुक्त करू असं वचन या जाहीरनाम्यात देण्यात आलंय. तसंच एलबीटी जकात कर रद्द करू आणि यासाठी समर्थ पर्याय उभा करू असं आश्वासनही देण्यात आलंय. मुंबईत अनेक रेल्वे स्थानकं ही अत्याधुनिक करण्यासाठी प्रयत्न सुरू असून ते निधी अभावी रखडले गेले आहेत त्यासाठी मुंबई रेल्वे विकास बोर्डास अधिकअधिक निधी मिळून देण्याचा प्रयत्न करू असंही नमूद करण्यात आलंय.

    मुंबई-गोवा, सोलापूर-येडशी, सोलापूर-औरंगाबाद-धुळे महामार्गासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देऊ तसंच अनेक गांवं अजूनही महामार्गांशी जोडले गेले नाही त्यासाठी अधिकाअधिक निधी मिळवून ते जोडू असं वचन यात देण्यात आलंय. नैसर्गिक आपत्तीत शेतकर्‍यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणं गरजेच आहे असं सांगत मदतीचा निकष बदलून काढू आणि शेतकर्‍यांना तात्काळ मदत मिळावी अशी व्यवस्था करू असं आश्वासन महायुतीनं दिलंय.

    जाहिरात

    महायुतीचा वचननामा

    • - मराठा आरक्षणाबद्दल स्पष्ट भूमिका नाही
    • - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक इंदू मिलच्या जागेवर उभारणार
    • - महिला आणि दलितांवरच्या अत्याचारांसंदर्भात कायदे कडक करणार
    • - आश्रमशाळा आणि वसतिगृहांचं आधुनिकीकरण करणार
    • - नैसर्गिक आपत्तीच्या निकषांमध्ये बदल करून शेतकर्‍यांना मदत मिळवून देणार

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात