06 डिसेंबर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आज 57वा महापरिनिर्वाण दिवस आहे. हातात निळे झेंडे घेऊन चिमुरड्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत हजारो लोक मुंबईतल्या आंबेडकरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले आपल्या कार्यकर्त्यांसह इंदू मिलच्या बाहेर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचं भूमीपूजन केले. त्यानंतर हजारो भीमसैनिक घोषणाबाजी करत परिसरात दाखल झाले. इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक होणार आहे. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी चैत्यभूमीवर जाऊन आंबेडकरांना श्रद्धांजली वाहिली. उपस्थित भीमसमुदायाचंही त्यांनी स्वागत केले. दरम्यान, महापरिनिर्वाणदिनी राजकारण नको, असे आवाहन या वेळ मुख्यमंत्र्यांनी केले. मध्यरात्रीपासून बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करणार्यासाठी देशभरातून आलेल्या अनुयायांनी रांगा लावल्या असून महापालिकेने आंबेडकरी अनुयायांच्या सुविधेसाठी सर्वप्रकारच्या व्यवस्था केल्या आहेत. तसंच चैत्यभूमी परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.