मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

टीपी-2 मल्टिप्लेक्समध्ये रिलीज होण्यावरुन प्रश्नचिन्ह कायम

टीपी-2 मल्टिप्लेक्समध्ये रिलीज होण्यावरुन प्रश्नचिन्ह कायम

timepass vs multi30 एप्रिल : 'टाइमपास'च्या यशानंतर टाइमपास 2 पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झालाय पण मल्टिप्लेक्सचालकांनी खोडा घातलाय. मल्टिप्लेक्सचालकांच्या अरेरावी पणाचा फटका टाइमपास 2 ला बसलाय. मल्टिप्लेक्सकडून हिंदी सिनेमांचा उत्पन्नाचा वाटा अधिक असतो पण मराठी सिनेमांची कमी टक्क्यावर बोळवण केली जात आहे. त्यामुळे 'टाइमपास 2'च्या निर्मात्यांनी सिनेमा सिंगल स्क्रिनमध्ये रिलीज करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

मागील वर्षी रवी जाधव दिग्दर्शित 'टाइमपास' सिनेमा मराठी रसिकांनी चांगलाच डोक्यावर घेतला होता. आता पुन्हा एकदा नव्या दमाने 'टाइमपास 2' उद्या अर्थात महाराष्ट्र दिनी रिलीज होतोय. पण पीव्हीआर, सिनेमॅक्स, ऍडलॅब्ज अशा प्रमुख मल्टीप्लेक्ससोबत अजूनही वाटाघाटी सुरू आहेत. हिंदी सिनेमांना पहिल्या आठवड्यात उत्पन्नाच्या 55 टक्के, दाक्षिणात्य सिनेमांना 50 टक्के मिळत असताना मराठी टाइमपास टू ला 45 टक्के का, असा निर्मात्यांचा सवाल आहे आणि याच मुद्दयावरुन चर्चा पुढे सरकत नाहीये. मल्टिप्लेक्सनी असंच धोरण ठेवलं तर हा सिनेमा मल्टिप्लेक्समध्ये रिलीज करायचा नाही असा निर्णय एस्सेल व्हिजनकडून घेतला जाऊ शकतो, जर तसं झालं तर महाराष्ट्र दिनाला रिलीज होणारा टाइमपास टू हा सिनेमा केवळ सिंगल स्क्रीन्स आणि पुण्यातील सिटीप्राईड, ई-स्क्वेअर अशा ठिकाणीच रिलीज होऊ शकेल.

मल्टिप्लेक्सचालकांच्या मुजोरीपणावर टिवट्‌रवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. त्यातील काही निवडक प्रतिक्रिया...

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

[if0]

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Prathmesh Parab, Priya bapat, Priyadarshan Jadhav