15 ऑक्टोबर : ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय. ठाण्यातील अनेक बिल्डरांना पालिका अधिकार्यांकडून छळ सुरू होता, असं त्यांनी पत्रात म्हटलंय. जून महिन्यामध्ये परमार यांनी नगर विकास राज्य मंत्र्यांनी मानसिक त्रास दिला जातोय अशा आशायचे पत्र दिले होते. त्यानंतर 23 जूनला नगरविकास खात्याच्या राज्य मंत्र्यांच्या दालनात बैठक होवून हा प्रश्न सोडवत परमार यांचे रखडलेले 4 प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आदेश देण्यात आले. मात्र, तरीही त्यांचे प्रकल्प रखडले आणि त्यानंतरच त्यांनी आत्महत्या केली . या बैठकीचे आदेश पत्र आयबीएन लोकमतच्या हाती लागले आहे.
परमार यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये काय म्हटलंय ?
“मला अपघातात मरायचं होतं. पण मी अपघातात मेलो असतो तर माझा मेसेज लोकांपर्यंत पोहोचला नसता. मी दोन महिन्यांपासून तणावाखाली होतो. त्या तणावाखाली मी हृदयविकाराच्या झटक्याने मेलो असतो. पण तसं न मरता आत्महत्या करणं मला सोपं वाटलं. मी माझ्या प्रोजेक्टमध्ये बर्याच चुका केल्या आहेत.
आपले जे कायदे आहेत ते अत्यंत जुने, पन्नासच्या दशकातले आहेत. तर या कायद्यांमध्ये सुधारणा व्हावी. आताचं हे जग बरंच पुढे गेलं आहे. परंतु आपण त्या जुन्या कायद्यांनुसारच चाललोय. आत्महत्या करण्यापलिकडे माझ्याकडे काही पर्याय उरला नाहीय. पालिकेच्या अधिकार्यांना हाताशी घेऊन काही स्थानिक राजकीय नेते आणि पुढारी मला ब्लॅकमेल करत होते.
त्यांना पैसे देऊनही ते वारंवार पैशाची मागणी करत होते. ठाण्यातले 90 टक्के बांधकाम व्यावसायिक त्यांच्या जाचाला कंटाळले आहेत. आम्हीही तुमच्यासारखेच (राजकीय नेते) आहोत. आम्हाला तुमच्यासारखंच वागवा, Pls.,Pls.,Pls.,Pls.,Pls.,Pls.,Pls. ठाणे महापालिकेचे अधिकारी बांधकामांना NOC देऊन नंतर स्वत:च स्टे आणतात, ह्याचा खूप त्रास होतो”
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++