जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / भूसंपादन विधेयकाविरोधात अण्णांचा उपोषणाचा इशारा

भूसंपादन विधेयकाविरोधात अण्णांचा उपोषणाचा इशारा

भूसंपादन विधेयकाविरोधात अण्णांचा उपोषणाचा इशारा

12 मे : ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी भूसंपादन विधेयकाविरोधात देशव्यापी आंदोलनाचा इशारा दिलाय. या विधेयकातल्या शेतकरीविरोधी शिफारशी काढल्या नाही, तर अमरण उपोषण करण्याचा इशाराही अण्णांनी दिलाय. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अण्णांनी मोदी सरकारविरोधात पुन्हा एल्गार पुकारलाय. अण्णांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकर्‍यांपेक्षा उद्योजकांच्या हिताचा जास्त विचार करतात. शेतकर्‍यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी सरकारनं विधेयकात बदल केले नाही तर आम्ही देशव्यापी जेलभरो आंदोलन करू आणि दुसरा पर्याय म्हणजे उपोषण.

  • -MIN READ
  • Last Updated :

    anna jantarmant 12 मे : ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी भूसंपादन विधेयकाविरोधात देशव्यापी आंदोलनाचा इशारा दिलाय. या विधेयकातल्या शेतकरीविरोधी शिफारशी काढल्या नाही, तर अमरण उपोषण करण्याचा इशाराही अण्णांनी दिलाय. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अण्णांनी मोदी सरकारविरोधात पुन्हा एल्गार पुकारलाय.

    अण्णांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकर्‍यांपेक्षा उद्योजकांच्या हिताचा जास्त विचार करतात. शेतकर्‍यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी सरकारनं विधेयकात बदल केले नाही तर आम्ही देशव्यापी जेलभरो आंदोलन करू आणि दुसरा पर्याय म्हणजे उपोषण. 2011 सालच्या उपोषणासारखं उपोषण मी करेन. त्यामुळे सरकारने याची नोंद घ्यावी असा शब्दात अण्णांनी उपोषणावर ठाम असल्याचं स्पष्ट केलं. तसंच विधेयकात शेतकरी हितासाठी आवश्यक बदल करावे, असं मी पंतप्रधानांना सांगितलेलं आहे. पंतप्रधानांच्या उत्तराची मी वाट बघत आहे. मला आशा आहे सरकार काहीतरी करेल असा विश्वासही व्यक्त केला. विशेष म्हणजे अण्णांनी याअगोदरही भूसंपादन विधेयकाच्या विरोधात एक दिवशीय उपोषण केलं होतं. तसंच देशव्यापी पदयात्रेचं आयोजन केलं होतं पण, काही कारणास्तव ती रद्द करण्यात आली. आता पुन्हा एकदा अण्णांनी उपोषणाचा इशारा दिलाय.

    ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

    Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात