11 नोव्हेंबर : बिहार निवडणुकीतील पराभवानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची पाठराखण केली आहे. बिहारच्या पराभवासाठी मोदी किंवा शहा यांना दोषी धरता येणार नाही. तशी बेजबाबदार वक्तव्य करणार्यांवर कारवाई करायला हवी, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
गडकरी म्हणाले, बिहारमधील पराभव ही सामूहिक जबाबदारी आहे. पक्षातील प्रत्येक नेता पराभवासाठी जबाबदार आहे. त्यामुळे केवळ मोदी आणि शहांना जबाबदार धरणे पूर्णपणे चूकीचे आहे. तशी बेजबाबदार विधानं करून पक्षाची प्रतिमेला धक्का पोहोचवणार्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी पक्षाध्यक्षांकडे केली आहे. बिहारमध्ये आमचा पराभव विरोधकांच्या एकजूटीमुळे झाला आहे. तसंच बिहारमध्ये आम्हाला यश मिळालं नाही हे खरं आहे. पण, निवडणुकीत पराभव झाला म्हणून कोणी संपत नाही. यापुढे भाजप अधिक जोमाने प्रयत्न करेल, असंही गडकरी पुढे म्हणाले. बिहारमधील पराभवाच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांना पक्षाच्या अध्यक्षपदावरून हटविण्याची चर्चाही गडकरी यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत
[if0] | Follow @ibnlokmattv[sc0] |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Narendra modi, Prime minister, RJD