टेक ऑफमध्ये माहिती मिळाली ती बायोडेटा ते इंटरव्ह्यू या प्रोसेसबद्दल. जेव्हा आपण एखादी नोकरी शोधतो तेव्हा आपण त्या ठिकाणी बायोडेटा पाठवतो. बायोडेटा, रेझ्युमी किंवा सीव्हीत फक्त माहिती नसते तर आपल्या संपूर्ण करिअरचा ग्राफ त्यात दिला जातो. बायोडेटा कोणत्याही व्यक्तीबद्दलचं मत तयार होत असतं. त्यामुळे तो लिहिणं आणि प्रेझेन्ट करणं हे मोठं स्किलचं काम असतं. या स्किलच्या कामाचं गुपित टेक ऑफमध्ये मॅनेजमेंट कन्सलटंट मंगेश मंगेश किर्तनेंनी सांगितलं. पेगसिस या संस्थेचे ऑरर्गनायझर्स आणि डेव्हलपर आहेत. सर्व क्षेत्रातल्या मान्यवरांना त्यांनी मार्गदर्शन दिलं आहे. कोणत्याही कंपनीत एच. आर. सायकलही महत्त्वाची गोष्ट असते. तर एच. आर सायकल म्हणजे काय ? मंगेश किर्तने : 20 - 22, 25 आणि 55 - 60 हा आपल्या आयुषातला काम करण्याचा काळ असतो. म्हणजे 35 - 40 वर्षांचा हा काळ असतो. या काळाची सुरुवात नोकरी शोधण्याचा शुभारंभ केल्यावर होतो. नोकरी सोडायचं ठरवलं किंवा करिअर बदलायचं ठरवल्यावर होतो. आजकाल तर लोकं मीड करिअरमधून वेगळं व्हायचं होतं. काही जण खूप आधीपासूनच एंतरप्रेन्युअरशीपला सुरुवात करतात. तो भाग वेगळा. तर या सर्वकाळाला एच.आर. लाइफ सायकल म्हणतात. या सकलची पहिली पायरी म्हणून बायोडेटा ते इंटरव्ह्यूकडे पाहिलं जातं. या साकयलमध्ये बायोडेटा कसा लिहावा ?
मंगेश किर्तने : इंटरव्ह्यू कसा द्यावा, इंटरव्ह्यूत सिलेक्शन झाल्यावर इंट्रोडक्शन ट्रेनिंग असतं ; या ट्रेनिंगचा फायदा कसा करावा, चांगलं काम करून चांगला परफॉर्मन्स रिपोर्ट कसा मिळवावा, त्यानंतर चांगल्या कामाचं कॉन्ट्र्ीब्युशन करून अधिकाधिक चांगल्या जबाबदा-या कशा पदारात पाडून घ्याव्यात, करिअर ट्रॅक जर चेन्ज करायचा झाला तर तो कसा करावा, जर पहिली नोकरी सोडून दुसरी नोकरी धरायची असेल तर ती कशी करावी हे सगळं एच. आर. लाइफ सायकलचा भाग आहे. बहुतेकदा बायोडेटात जडजड शब्द वापरून तो सजवला जातो. कधीकधी तर बायोडेटा लिहिताना स्वत:ची फसवणूक केली जाते. तर असं होऊ नये याकरिता चांगला बायोडेटा कसा असावा, त्याचे की पॉइन्टस् काय आहेत ? मंगेश किर्तने : आपलं जे मूळ व्यक्तिमत्त्व असतं ते नॅचरल असतं आणि तेच खरं व्यक्तिमत्त्व असतं. बायोडेटा लिहिताना आपल्या मूळ व्यक्तिमत्त्वात बदल करू नये. मग ते आर्टिफिशयल वाटतात. कारण या आर्टिफिशयल व्यक्तिमत्त्वातून निरनिराळ्या अपेक्षा निर्माण होतात. ज्या आपण कधीच पूर्ण करू शकत नाहीत. मी खूप काहीतरी वेगळं करेन ज्यात मला आवडतच नाहीये, असं काही बायोडेटात लिहू नये. नोकरीदेणा-याचे अपेक्षाभंग होतील असं काही बायोडेटात लिहू नये. मुलाखत घेणारा इंटरव्ह्यूमध्ये तुमच्यात काय बघत असतो ?
मंगेश किर्तने : मुलाखत घेणारा जेव्हा उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावतो ; तेव्हा ती मुलाखत कोणत्या पदासाठी आहे हे उमेदवाराला माहीत असणं गरजेचं आहे. ज्या पदाच्या मुलाखतीसाठी बोलावलेलं असतं त्या पदाच्या काही फंक्शनल आणि टेक्निकल रिक्वायरमेन्ट असतात. तेव्हा त्या फंक्शनल आणि टेक्निकल रिक्वारमेंट ती किंवा तो पूर्ण करत आहे का, हे ज्याचं त्यानं पडताळून पाहिलं पाहिजे. ते असेल तर ती माहिती अचूक दिली पाहिजे आणि त्या माहितीत कोणताही बदल असू नये. म्हणजे मुलाखत घेणा-यांनं तर प्रव्होक केलं अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर ती माहिती त्या मुलाखत घेणा-याला देता आली पाहिजे. तुमचे कामाचे अनुभव, मागच्या कंपनीत काम करताना तुमचा कामाचा रोल काय होता, तुमची वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्याची तयारी आहे का, या गोष्टी बायोडाटात लिहणं किंवा मुलाखतीत डिसकस करणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे इंटरव्ह्यूला जाण्यासाठी तुम्ही मनानं त्या प्रक्रियेला सामोरं गेलं पाहिजेत. तसंच मनात काही प्रश्नांची तयारी केली पाहिजे का ?
मंगेश किर्तने : हो. अगदी बरोबर. आणि आपण दुसरा असा विचार केला पाहिजे की, आज मी एखाद्या ठिकाणी कॅन्डीडेट म्हणून जातोय. परंतु मुलाखत घेणा-याचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असेल, मुलाखत घेणा-याला माझ्याकडून काय अपेक्षा आहेत, त्याला जे हवंय ते मी देऊ शकेन का, ते जर मी देऊ शकेन तर ते मला कसं सांगता आलं पाहिजे याचा पूर्ण विचार केला पाहिजे. म्हणजे इंटरव्ह्यूची प्रोसेस ही थोडीशी सेल्स प्रोसेसच आहे. तुमच्याकडे काय काय म्हणून चांगल्या गोष्टी आहेत, त्या सांगता आल्या पाहिजेत. एकदा की सेल्स प्रोसेस पूर्ण झाली की तुमचा रोल काय आहे हे जाणून घेतलं पाहिजे. रोल काय आहे म्हणजे तुमची कामाची प्रोसेस. त्यानंतर तुमच्या कामच्या शंका विचारल्या पाहिजेत. खुल्या वृत्तीनं इंटरव्ह्यू दिला पाहिजे. सीव्हीमध्ये फ्रेशर्सनी कोणत्या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे ?
मंगेश किर्तने: फ्रेशर्सनी त्यांच्या सीव्हीत स्वत:च्या गुणांबद्दल लिहिलं पाहिजे. स्वत:चे गुण जर ओळखता आले नाहीत तर नातेवाईक, घरची मंडळी, मित्रमंडळींना विचारून ते लिहा. अपंग व्यक्तींनी किंवा फिजकल चॅलेंज असणा-यांचा बायोडाटा कसा असायला हवा ?
मंगेश किर्तने : अपंग किंवा फिजकली चॅलेंज असणा-या व्यक्तींनी त्यांना असणारं शारीरिक अपंगत्त्व सुरुवातीला नाही पण कुठेतरी मधेच बायोडेटात लिहिलं पाहिजे. जसं बायोडेटात तुमच्या आवडीनिवडी लिहिल्या जातात तशा लिमिटेशन्सही लिहिल्या गेल्या पाहिजेत. म्हणजे माझा चष्म्याचा नंबर जास्त असल्यामुळे मला कम्प्युटरवर काम करताना अमूक एक प्रकारचं शिल्ड लागतं. अशा व्याधी लिहिताना त्याबरोबर डॉक्टरचं सर्टिफिकेट जोडावं. त्या सर्टिफिकेटमध्ये डॉक्टरांनी जी काही फिटनेस लेव्हल सजेस्ट केली असेल तीही जोडली पाहिजे. आपली फिटनेस लेव्हल आपल्या एम्प्लॉयरला सांगणं जरुरी आहे.
आपले निरनिराळे इंटरेस्ट असतात ते बायोडेटात कसे लिहिले गेले पाहिजेत ?
मंगेश किर्तने: उमेदवाराला गिर्यारोहणाची, फोटोग्राफीची, पॉलिटिक्स या गोष्टींची आवड असेल तर ती त्यांनी सीव्हीत हॉबी म्हणजेच छंद ही कॅटेगरी असते, त्यात लिहिली पाहिजे. तसंच या छंदांचा कामावर परिणाम होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे. म्हणजे इंटरव्ह्यूवर काय बघतो, याचं भान असलं पाहिजे तर…
मंगेश किर्तने : हो. बरोबर आहे. कारण मी पाच ते सहा तास काम करून वेगळ्या प्रकारची हॉबी जोपासणार असेल तर मला माझा मेन रोल करता येईल का, या कामासाठी कंपनीच्या आणि माझ्या सहका-यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या मी पूर्ण करू शकेन का, याचापण विचार केला पाहिजे. तसा बायोडेटा डिझाईन केला पाहिजे. बहुतेकदा बायोडेटा लिहिताना मुलं छंदाच्या कॅटेगिरीत काहीतरी लिहायचं म्हणून लिहितात.पण प्रत्यक्षात उमेदवाराला त्याची माहिती कमी असते. तर अशावेळी उमेदवारांनं काय करावं ?
मंगेश किर्तने : उमेदवार त्याच्या बायोडेटात जे काही लिहणार आहे आणि लिहिलं आहे ते तंतोतंत खरं असलं पाहिजे. त्या विषयी उमेदवाराला चांगली माहिती असली पाहिजे. तसंच त्या दृष्टीनं विचार करता आला पाहिजे. म्हणजे उमेदवारला गाण्याचा छंद असेल तर त्याच्याकडे गाण्याचं कलेक्शन असलं पाहिजे. राग संगताची आवड असेल तर त्याविषयीची माहिती असायला हवी. एखादं वाद्य वाजवता त्यावेळी ते शिकण्यासाठी कोणाकडे जातात, शिकणा-याचीही माहिती असायला हवी. आपल्याला इंटरव्ह्यूवरनं एखाद्या छंदाबद्दल माहिती विचारली आणि ती सांगता आलीच नाही, तर आपलं चुकीचं इम्प्रेशन पडतं. इंटरव्ह्यूवरवर विपरित परिणाम होतो. यावरून तुमचा फोकस कळतो. तो किती चांगला आहे याचीही कल्पना येते. एकावेळेला 10 ते 15 छंद असून फायद्याचं नाही. उगाचच काहीतरी भारंभार लिहू नये. नव्या नोकरीसाठी किंवा वेगळ्या प्रकारच्या नोकरीसाठी प्रत्येकवेळा बायोडेटा रिडिझाईन करणं किंवा वेगळ्या प्रकारचा बायोडेटा लिहिणं गरजेचं आहे का ?
मंगेश किर्तने : हो. कारण आपण बायोडेटा ते इंटरव्ह्यू या प्रासेसकडे लाइफ जर्नी या पद्धतीनं बघत आहोत. कारण त्यात लिहिलेली माहिती तुम्ही काय करू शकता, तुमचा आयुष्याकडे बघण्याचा फोकस, तुम्हाला आलेल्या अनुभवांतून तुम्ही काय शिकला आहात याची कल्पना इंटरव्ह्यूवरला येते. त्यामुळे जुनी नोकरी सोडून नवीन नोकरी धरताना जुन्या नोकरीतून तुम्ही जे काय शिकलात ते लिहिता आलंच पाहिजे. बायोडेटाचा सिक्वेन्स कसा असावा ? बायोडेटाची सुरुवात कशी असावी ? इंटरव्ह्यूला जाताना तुमचा ड्रेस कोड काय असावा ? मंगेश किर्तने : बायोडेटा दोन पद्धतीनं लिहिले जातात. एका बायोडेटाला रिव्हर्स क्रोनोलॉजिकल बायोडेटा म्हणतात. म्हणजे सुरुवातीला तुम्ही सध्या जिथे काम करत आहात तो अनुभव लिहिला जातो. मग त्याच्यानंतर पूर्वीचा अनुभव लिहिला गेला पाहिजे. दुस-या पद्धतीत सर्वात आधी बायोडेटा पर्टिक्युलर्स द्यायचे. त्याच्या नंतर शिक्षण आणि त्याच्यानंतर अनुभव लिहिले गेले पाहिजे. या दोन पैकी कोणतीही एक पद्धत फॉलो केली तर चांगलं होईल. फक्त तुमच्या बायोडेटात सिक्वेन्स असणं महत्त्वाचं आहे. त्याही पेक्षा काहीजण करिअर ऑब्जेक्टिव्हजचा वापर करून बायोडेटा लिहितात. त्यात करिअरचे काही विचार असतील तर ते लिहा. नसतील तर लिहून चुका करून लिहू नका. करिअर ऑब्जेक्टिव्हनं जर बायोडेटा लिहिण्याचा प्रयत्न केला तरइंटरव्ह्यूवर त्याचं चांगलं इम्प्रेशन पडतं. तुमचा करिअरचा फोकस कळून येतो.सेल्स प्रोसेससाठी बायोडेटा कसा लिहावा ? मंगेश किर्तने : इन्शुरन्स किंवा आणखी काही सेल्सशी निगडीत नोकरीसाठी सर्वात आधी म्हणजे आपला कामाचा अनुभव महत्त्वाचा असत डाय हाड ऍटीट्यूड आहे का, फिजिक फीट आहे का, खूप हिंडावं लागतं, ट्रॅव्हलिंग करावं लागतं तर हे गुण आपल्याकडे असतील तर त्याचा आंतर्भाव , आपल्या बायोडाटात केला पाहिजे. कारण या गुणांचा जास्त उपयोग होण्यासारखा असतो. इन्शुरन्स म्हणजे काय, ऍक्च्युअरीज म्हणजे काय, कोणती स्किम कोणाल चांगली ठरू शकते याची माहिती असणे महत्त्वाचे आहे. कंपनीत गेल्यावर ट्रेनिंगप्रमाणं माहिती मिळू शकते. पण बेसिक माहिती असणं केव्हाही चांगलं.
ज्यांना 10 किंवा 12 वीला 45 टक्क्यांपेक्षा कमी गुण असतील तसंच 15वीची परीक्षा क्लास इम्पुव्हमेन्टची परीक्षा देऊन दिली असेल तर हे सगळं बायोडेटात कसं लिहावं ? मंगेश किर्तने : जी लोकं असे असतील की त्यांचा करिअर ग्राफ एखाद्या महत्त्वाच्या परीक्षेत खाली गेला असेल तर ते हायलाईट करण्याची गरज नाही. पास क्लास असंही लिहायला हरकत नाही. पण जर इंटरव्ह्यूअरनं विचारलं तर त्याचं उत्तर प्रांजळपणं द्यावं. तसंच त्यांची कारण मिमांसाही सांगायला हवी. म्हणजे आजारपण असेल तर तसं, घरची काही अडचण असेल तर तसं आणि जर हीही कारणं नसतील तर माझं कॉन्स्ट्रेशन कमी पडलं हीही कारणं सांगावीत. इंटर्नशीपसाठी रेझ्युमी लिहिताना तो कसा लिहावा ? मंगेश किर्तने : इंटर्नशीपसाठी नेहमीप्रमाणं बायोडेटा लिहावा. पण त्या बायोडेटासोबत तुमच्या एचओडीचं किंवा प्राध्यपकांचं रेकमेन्डेशन लेटर जोडलं तर तुमचा बायोडेटाला वेटेज प्राप्त होतं.
कार्यक्रमात बीडहून अशोक आठवले यांनी एक प्रश्न विचारला होता. त्यांचा प्रश्न होता -अपंग व्यक्तीना एम्पीएसीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर काही राखीव जागांवर नोकरी मिळू शकतो. तर त्या पदांसाठी अर्ज करताना काय बायोडेटा कसा तयार करावा ? एमपीएससीच्या परीक्षेसाठी अपंगाची चार भागात वर्गवारी केलेली आहे. 1 अंध किंवा अर्धदृष्टी 2. कर्णबधीर 3. एक पाय आणि एक अधू 4. दोन्ही हात किंवा दोन्ही पाय अधू या परीक्षेत अपंगासाठी 30टक्के आरक्षण आहे. तसंच एमपीएससीच्या फॉर्ममध्ये अपंगत्वाचा दावा केला असेल तर 40टक्के पेक्षा जास्त अपंगत्वाचा सर्टिफिकेट द्यावं लागतं. हे सर्टिफिकेट अर्जकर्ता जर मुंबईच्या बाहेरचा असेल तर सिव्हिल सर्जनकडून द्यावं आणि मुंबईत राहणारा असेलतर सिव्हिल सुप्रिटंडन्टकडून द्यावं.
( या प्रश्नाचं उत्तर स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक आनंद पाटील यांनी दिलं आहे. )
इंटरव्ह्यूला जाताना…आपण जिथं नोकरी शोधतो त्या कंपनीची संपूर्ण माहिती करून घ्या. ती कंपनी ज्या सेक्टरमध्ये काम करते त्या सेक्टरविषयी माहिती मिळवा. प्रत्येक इंटरव्ह्यूची माहिती तयारी करावी लागते. स्वत:चं व्यक्तिमत्त्व जाणून घ्या. आपलं इम्प्रेशन काय पडतं ते समजून घ्या. आपल्या प्रेझेंटेशनबद्दल मित्रांकडून फीडबॅक घ्या. इंटरव्ह्यूला जाताना बायोडेटाची कॉपी बरोबर घ्या.भारंभार सामान, वेगवेगळ्या पर्स, पिशव्या घेऊन इंटरव्ह्यूला जाऊ नये. एखादी फाईल आणि पर्स सोबत ठेवावी. फॉर्मल ड्रेस शक्यतो असावा. इंटरव्ह्यूदरम्यान तीव्र मतप्रदर्शन टाळावं. आपल्या नोकरीसंदर्भात प्रश्न विचारावेत.बायोडेटा लिहिण्यास मदत करणार्यांसाठी
बायोडाटा लिहिण्याचा सल्ला देणार्या कंपन्या आहेत. त्या एजन्सीज्ची मदत घेता येऊ शकते. इंटरनेटवर बायोडेटासंदर्भात अनेक टीप्स मिळतात. त्यांचं वाचन करा.
इंटरव्ह्यूला जाताना मनात भीती बाळगू नका. इंटरव्ह्यूमध्ये बायोडेटासंदर्भात प्रश्न विचारले जातात. त्यामुळे विसंगत उत्तरं देऊ नका आणि बोलूही नका. बायोडेटामध्ये खोटी माहिती देऊ नका. इंटरनेटवर बायोडेटा अपलोड केला असेल तर तो आपल्या कंपनीतली माणसंही बघू शकतात याचं भान बाळगा.एक प्रोफेशनल म्हणून म्हणून स्वत:च्या गुणदोषांचं भान बाळगा. आपण काय करू शकतो ते अतिशयोक्ती न करता सांगा. इंटरव्ह्यूचं भय बाळगू नका.इंटरव्ह्यू घेणारा काय तपासतो ?मूलभूत ज्ञान.आकलन.चटपटीतपणा.निर्णय घेण्याची क्षमता.रिस्क घेण्याची क्षमता .आयुष्याकडून शिकण्याची वृत्ती .टीमबरोबर काम करण्याची वृत्ती .खिलाडूपणा .माणूस म्हणून मोठं व्हायची जिद्द .नोकरीसाठी आवश्यक त्या गुणांचं मॅचिंग.
आपला रेझ्युमे तयार करणं हे अनेकांना कठीण जातं…तो कसा तयार करावा, त्यात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असला पाहिजे या सगळ्यांची माहिती आपल्याला www.resume-resume.com बेवसाईटवरही मिळू शकते.
बायोडेटा ते इंटरव्ह्यूचे पुढचे दोन भाग पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
बायोडेटा ते इंटरव्ह्यू (भाग - 2) बायोडेटा ते इंटरव्ह्यू (भाग - 3)







