मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /LIVE : मोदी सरकारचं पहिलं रेल्वे बजेट सादर

LIVE : मोदी सरकारचं पहिलं रेल्वे बजेट सादर

  ibnlokmat_rail_budget_2014

  LIVE

  • विरोधकांच्या गोंधळामुळे 2.10 वाजेपर्यंत संंसदेचं कामकाज तहकूब
  • नागपूर- अमृतस साप्ताहिक रेल्वेची घोषणा

   कसारा-इगतपुरी नवीन लाईन ट्रॅक

   सोलापूर- तुळजापूर नवीन लाईन ट्रॅक

   केदारनाथ आणि बदि्रनाथपर्यंत रेल्वे लाईन्स टाकणार

   5 जनसाधारण 5 प्रिमियम 6 एसी 27 एक्स्प्रेस 8 पॅसेंजर रेल्वेची घोषणा

   सणांच्या दिवसांमध्ये खास गाड्यांची घोषणा

   नवीन लाईन्स टाकण्यासाठी 18 सर्व्हेक्षण करण्यात आले

   इंधनात 5 टक्के बायोडिझेलचा वापर करणार - गौडा

   पुर्वोत्तर राज्यांमध्ये रेल्वेच्या विस्तारासाठी 54 टक्के जास्त तरतूद -गौडा

   रेल्वे कर्मचार्‍यांच्या पीएफ 500 वरून 800 ची वाढ -गौडा

   रेल्वे शेतमालासाठी एस्सी गोदाम बांधणार -गौडा

   10 स्टेशन्सचा विमानतळांप्रमाणं विकास -गौडा

   दूध, फळ, भाज्या आणि शेतीमालाच्या मालवाहतुकीला प्राधान्य असून त्यासाठी खास सुविधा निर्माण करणार- गौडा

   9 मार्गांवर हाईस्पीड रेल्वे गाड्या -गौडा

   दिल्ली-आग्रा, दिल्ली-चंडिगढ, दिल्ली-कानपूर, कानपूर-नागपूर, म्हैसूर-बंगळुरू-चेन्नई मार्गावर हायस्पीड गाड्या

   मोठ्या शहरांसाठी हायस्पीड कॉरीडॉर्स - गौडा

   अ दर्जाच्या ट्रेन्स मध्ये वाय फाय सुविधा

   4 हजार महिला कॉन्स्टेबलची नियुक्ती करणार - गौडा

   9 विभागात रेल्वेच्या वेगात वाढ करणार तासाला 160 ते 200 किमीपर्यंत वेग वाढवणार

   रेल्वे विद्यापीठाच्या स्थापनेची घोषणा येत्या पाच वर्षाच रेल्वेचे पेपरलेस ऑफिस करणार - गौडा

   रेल्वे विद्यापीठाच्या स्थापनेची घोषणा

   मुंबई अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन्सची घोषणा - गौडा

   बुलेट ट्रेन्सच्या कामाला लवकरच सुरुवात - गौडा

   महाराष्ट्राच्या वाट्याला : पंढरपूर ते गदग खास पर्यटन ट्रेन - गौडा

   सीसीटीव्हीच्या माध्यमातून रेल्वेस्थानकातल्या स्वच्छतेवर लक्षं ठेवणार - गौडा

   पोस्ट ऑफिसमध्येही तिकीट बुकिंगची सुविधा - गौडा

   जनरल आणि प्लॅटफॉर्म तिकीट आता इंटरनेटच्या माध्यमातून - गौडा

   मोबाईलच्या माध्यमातून तिकीट बुकिंगसाठी व्यवस्था करणार - गौडा

   पर्यटनाला प्रोत्साहन देणार जैन, बौद्ध, शिख, सुफी स्थळांना जोडणार्‍या खास पर्यटन गाड्यांची सुरवात करणार -गौडा

   मोबाईलच्या माध्यमातून तिकीट बुकिंगसाठी व्यवस्था करणार - गौडा

   रेल्वे स्थानकांच्या स्वच्छतेसाठी वेगळा विभाग - गौडा

   रेल्वे स्थानकांच्या स्वच्छतेला प्राधान्य - गौडा

   मोठ्या रेल्वे स्टेशन्सवर फुड कोर्ट रेल्वेतल्या जेवणाचा दर्जा सुधारणार -गौडा

   50 रेल्वे स्थानकांवर स्वच्छतेसाठी तज्ज्ञ संस्थांची मदत -गौडा

   रेल्वे गाड्यांमध्ये फिल्टरचे पीण्याचे पाणी -गौडा

   सर्व स्टेशन्सवर बॅटरीवर चालणार्‍या गाड्या

   एक्सलेटर्स, पाण्याची सुविधा, शौचालयांची निर्मिती करणार

   सर्व मोठ्या रेल्वे स्टेशन्सवर सुविधा वाढवणार

   रेल्वेचं उत्पन्न वाढवण्याची गरज - गौडा

   प्रवासी तिकीटांमधून 44645 कोटींचे उतपन्न - गौडा

   रेल्वेचं उत्पन्न वाढवण्याची गरज - गौडा

   रेल्वेत FDI आणणार - गौडा

   नवीन रेल्वे स्टेशन्सची निर्मिती आणि वॅगन्सच्या निर्मितीसाठी FDI चा वापर

   एका बुलेट ट्रेन साठी 60 हजार कोटी पाहिजे त्यासाठी भाडे वाढ गरजेची आहे - गौडा

   आंतरराष्ट्रीय सुरक्षा नियमांचं पालन करणार - गौडा

   रेल्वेत खासगी गुंतवणूक आवश्यक - गौडा

   देशाच्या संरक्षणातही रेल्वेचे योगदान - गौडा

   बारामुल्ला ते कन्याकुमारी असा रेल्वेचा विस्तार - गौडा

   माल वाहतुकीतून धोरणात अमुलाग्र बदलाची गरज - गौडा

   दरवर्षी रेल्वेला 50 हजार कोटींची गरज - गौडा

   3738 किमी ची नवीन रेल्वे लाईन टाकण्याची योजना - गौडा

   दररोज 12,617 ट्रेन्स धावतात -गौडा

   रेल्वेत नव्या गुंतवणुकीची गरज

   रेल्वेच्या कारभारात अमुलाग्र बदल पाहिजे - गौडा

   दररोज 12,617 ट्रेन्स धावतात - गौडा

   रेल्वे ही भारतीय अर्थव्यवस्थेचा आत्मा - गौडा

   लोकांच्या आमच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत - गौडा

   लोकांच्या आमच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत - गौडा

   रेल्वे हा अर्थव्यवस्थेचा पाया - गौडा

   दररोज 23 मिलियन लोक प्रवास करतात

   2014-15 चं रेल्वे बजेट संसदेत सादर

   =============================================================================

  08 जुलै : लोकसभेत एकहाती सत्ता मिळवल्यानंतर मोदी सरकारची आता खर्‍याअर्थाने कसोटी लागणार आहे. आजपासून मोदी सरकारचं पहिलं संसदेचं अधिवेशन सुरू झालंय. देशाला अर्थव्यवस्थेला 'रक्त' पुरवढा करणारी धमणी अर्थात रेल्वेचं बजेट सादर होणार आहे. रेल्वेमंत्री डी. व्ही. सदानंद गौडा मंगळवारी रेल्वे अर्थसंकल्प मांडणार आहेत. सोमवारी रेल्वेमंत्र्यांनी बजेटवरुन अखेरचा हात फिरवला. त्यामुळे सर्वसामान्यांच्या पदरात काय पडणार आहे याकडे उभ्या देशाचं लक्ष लागलंय.

  विशेष म्हणजे सरकारने बजेट सादर होण्यापुर्वीच रेल्वेच्या मालवाहतूक भाड्यामध्ये 6.5 टक्के  तर प्रवासी भाड्यामध्ये 14.2 टक्क्यांनी वाढवलंय. त्यामुळे आता रेल्वेच्या कारभारात सुधारणा आणण्यासाठी रेल्वेमंत्री काय घोषणा करतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. पण तरीही रेल्वेमंत्री काय घोषणा करणार आहे याबद्दल काही अपेक्षा नक्कीच असणार आहे. अगोदरच रेल्वे खातं दरवर्षी 26 हजार कोटींचा तोटा सहन करत आहे. त्यामुळे रेल्वेमंत्री फार मोठ्या अशा घोषणा करणार नाहीत असाच अंदाज आहे.

  तर अगोदर भाववाढीचा झटका दिल्यानंतर जनतेला खूश करण्यासाठी काही दिलासादायक निर्णय घेतले जातील. विशेष म्हणजे डबघाईला आलेल्या रेल्वे खात्याला बाहेर काढण्यासाठी थेट परकीय गुंतवणूक अर्थात FDI पॉलिसी जाहीर करण्याची शक्यता आहे. तसंच परदेशी धणाढ्य बँका म्हणजेच वर्ल्ड बँक, जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी आणि एशियन डेव्हलपमेंट बँक यांच्याकडे पुन्हा पदर पसरवला जाणार का हेही पाहावे लागेल. त्यामुळे रेल्वेमंत्र्यांच्या सुटकेशीतून काय काय बाहेर पडणार हे पाहण्याचं ठरले.

  रेल्वेमंत्र्यांकडून काय अपेक्षा आहेत ?

  - रेल्वेला सध्या 26,000 कोटी रुपयांची गरज आहे. हे पाहता फार मोठ्या घोषणा करणार नाहीत

  - लोकांना खूश करणारे निर्णय न घेता, रेल्वेचा कारभार सुरळीत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न

  - इंधनासाठीचा वाढता खर्च पाहता सौर ऊर्जा आणि बायो डिझेलच्या वापरासाठी प्रयत्न किंवा प्लांटसाठी तरतूद

  - वर्ल्ड बँक, जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी, एशियन डेव्हलपमेंट बँककडून भांडवल मिळवण्याचा प्रयत्न

  - पब्लिक - प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा

  - थेट परकीय गुंतवणूक रेल्वे क्षेत्रात आणण्यासाठी FDI पॉलिसी जाहीर करण्यात येण्याची शक्यता

  - सुरक्षित आणि वेगवान प्रवास आणि प्रवाशांचं संरक्षण यावर भर

  +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

  [if0] [sc0]

  +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  First published:

  Tags: Narendra modi, NDA, Sadananda gowda, Train, अर्थसंकल्पीय अधिवेशन